सार्वजनिक बांधकाम विभागाची केली दिशाभूल.
नाशिक प्रतिनिधी
जरात राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना होणारा त्रास टाळण्यासाठी हडकाईचोंड ते गुजरातहद्द रस्त्याचे १ कि.मी रस्ता सुधारणा करण्याचे काम सुरू असून डांबरदृश्य आईल टाकून ह्या रस्त्याचे काम सुरू केले. सार्वजनिक बांधकाम विभागाची दिशाभूल करीत हडकाईचोंड ते भुरभेंडी असा रस्ता रात्रीच उरकल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने या गुजरात हद्द रस्त्याचे हे काम किमान पावसाळा येईपर्यंत तरी टिकावे एवढीच अपेक्षा या भागातील सरपंच रमेश वाडेकर,पोलीस पाटील काशिराम भौये, सुभाष भौये,लासू गावित, रमेश राऊत ,संजय चौधरी, प्रकाश पाडवी, गोपाळ भौये, धनराज भौये,शिवराम खिराडे, सिताराम गवळी, सदाशिव पवार, दत्तू ठाकरे,तसेच परिसरातील जनतेकडून व्यक्त केली जात आहे. हडकाईचोंड ते गुजरात राज्य हद्द भुरभेंडी या रस्त्याचे उद्घाटन आमदार नितीन भाऊ पवार यांनी केले,या रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्ती होणार अशी घोषणा केली होती,या रस्त्यामुळे गुजरात राज्यातील प्रवाशांना महाराष्ट्र रस्ता चांगला दर्जेदार होणार म्हणून आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु या रस्त्याचे संबंधित ठेकेदार यांनी एका रात्रीत रस्ता केल्याचा आरोप नागरिकांनी केला, या रस्त्याचे काम पाच-सहा दिवसांपूर्वी केले असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे, यामुळे सर्व वाहन धारकांमध्ये व
प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या कामात डांबरा ऐवजी काळे आॅईल सदृश काळे पाणी, वापरले जात असल्याने बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडत आहे, विशेष म्हणजे या कामाकडे विद्यमान आमदार व सार्वजनिक
बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सदर रस्ता हा सुरगाणा, अंबाठा, खुंटविहीर, पिंपळसोंड गुजरात मधील दगडपाडा ,भुरभेंडी ते पांगारणे तसेच वारसा गुजरात असा जोड रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वणी, शिर्डी, त्र्यंबकेश्वर येथे ये- जा करणा-या प्रवाशांची सारखी वर्दळ असते.
त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्याचे काम दर्जेदार करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सदर रस्ता हा गुजरात ते महाराष्ट्र असा जोड रस्ता असून गेल्या चार वर्षापूर्वी च झाला होता. त्यावेळी सबंधित ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले होते. त्यामुळे एका वर्षांतच रस्ता खराब झाला होता. आम्ही गुजरात राज्याच्या सीमेजवळ राहतो. त्यामुळे विविध विकास कामांच्या दर्जाबाबत गुजरात राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्रात प्रत्येक कामात अधिकारी ते संबंधित लोकप्रतिनिधी यांची टक्केवारी जास्त असल्याने कामाचा दर्जा राखला जात नाही.
गुजरात राज्यातील महाराष्ट्र सिमेलगतचे उंबरठाण ते धरमपूर, सुरगाणा तळपाडा ते आहवा डांग, बर्डीपाडा ते वासदा या रस्त्याची पाहणी व लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांनी अवश्य भेट देऊन करावी. तसेच ठेदारांकडून टक्के वारी कमी केल्यास निश्चित पणे कामांचा दर्जा राखला जाईल.
रमेश वाडेकर
. माजी सरपंच