नाशिक

मार्चपासून शिधापत्रिकाधारकांना मिळणार मका

तांदूळ पूर्ववत, तर गव्हाच्या प्रमाणात एक किलो घट

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदळासोबत मकादेखील मार्चपासून मिळणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत मक्याचे उत्पादन जास्त झाल्याने धान्य वितरणात शासनाकडून बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ देण्यात येत होता. त्याऐवजी आता एक किलो गहू, एक किलो मका आणि तीन किलो तांदूळ देण्यात येणार आहे. एक किलोने गहू कमी करत एक किलो मका देण्यात येणार आहे. तांदूळ पूर्वीप्रमाणेच देण्यात येणार आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांत तांदळाऐवजी मका देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना तांदूळ मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता नाशिक जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ व मका मिळणार आहे. प्रतिव्यक्ती एक किलो गहू कमी करण्यात आल्याने शिधापत्रिकांधारकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, राज्यातील काही भागांत शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर मका उत्पादन घेतले आहे. उत्पादन वाढल्यामुळे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा आणि साठवणुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत मक्याचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्व जिल्ह्यांंना लागू नसून ज्या भागात मक्याची उपलब्धता अधिक आहे तेथेच त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांंमध्ये मक्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे शासनाने काही विशिष्ट भागांत तांदळाऐवजी मक्याचे वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती एक किलो गहू, एक किलो मका, तीन किलो तांदूळ मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मार्चपासून होणार आहे.
– सीमा अहिरे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी

Ration card holders will get maize from March

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

4 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

4 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

4 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

4 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

4 hours ago

बांगलादेशमधील सत्तांतर

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…

5 hours ago