कैरीचे लोणचे

कच्च्या कैरीचे लोणचे बनवण्यासाठी मोहरीचे तेल उत्तम आहे. तीळ किंवा शेंगदाणा तेलदेखील वापरता येते.
लोणचे बनवल्यानंतर ते मलमल किंवा सुती कापडाने झाकून ठेवल्यास अतिरिक्त ओलावा निघून जातो आणि लोणचे जास्त काळ खराब होत नाही.
कैरीचे लोणचे फक्त कोरड्या बरणीत भरा आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. यामुळे लोणचे जास्त काळ खराब होणार नाही.
कच्च्या कैरीचे लोणचे बनवण्यासाठी साहित्य :
कैरी 1 किलो, मीठ 90 ग्रॅम, हळद 2 चमचे, लाल तिखट 2 चमचे, हिंग 1/4 चमचे, मेथी दाणे 4 चमचे, पिवळी मोहरी 4 चमचे, बडीशेप 4 चमचे, कलोंजी अर्धा चमचा, दीड कप तेल.
कृती :
एका कैरीचे 8-10 तुकडे करा. मेथी आणि बडीशेप बारीक वाटून घ्या. एका भांड्यात तेल चांगले गरम करून गॅस बंद करा. भांड्याचा आकार असा असावा की, कैरी आणि मसाले सहज मिसळता येतील. तेलात प्रथम बारीक वाटून मेथीदाणा टाका. नंतर त्यात हिंग, मोहरी आणि भरड बडीशेप घाला आणि परता. आता हळद आणि लाल तिखट घाला. हळद आणि तिखट घालताना तेल गरम नसावे. नाहीतर लोणच्याचा रंग खराब होऊ शकतो. पूर्णपणे थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर लोणचे रुंद तोंडाच्या काचेच्या बरणीत भरून ठेवा.

Raw Mango Pickle

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *