रेमंड उद्योग समूहाचे संस्थापक
विजयपत सिंघानिया यांचे निधन
मुंबई:
भारताच्या कॉर्पोरेट जगतातील अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व, पद्मभूषण एअर कमोडोर (डॉ.) विजयपत कैलाशपत सिंघानिया यांचे काल निधन झाले. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र, गौतम सिंघानिया यांनी ट्विटरवर ही बातमी दिली. रेमंड ग्रुपच्या माजी अध्यक्षांच्या निधनाच्या बातमीनं उद्योगक्षेत्रात धक्का बसला आहे. ‘द कम्प्लीट मॅन’ म्हणून रेमंडला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
भारत सरकारने त्यांना पद्धमभूषण पुरस्काराने गौरविले होते. . 1938 मध्ये जन्मलेले विजयपत सिंघनिया यांनी रेमंड उद्योग समूहाची उभारणी केली होती. 1980 ते 2015 या कालावधीत त्यांनी या समूहाचे चेअरमन पद भूषवले. त्यांनी लंडन विद्यापीठ ची मानद पीएचडी पदवी प्राप्त केली होती. 2006 मध्ये त्यांना पद्धमभूषण पुरस्काराने गौरविले होते. जगातील सर्वांत उंच एअर बलून ने उड्डाण करण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला होता. सिन्नर एमआयडीसी मध्ये या विक्रमा बद्दल आमदार माणिकराव कोकाटे यांनी सत्कार करण्यात देखील केला होता. सिंघनिया यांनी केलेल्या विक्रम बद्दल पुस्तकही लिहिले होते.
आज होणार अंत्यसंस्कार
:रेमंड ग्रुपचे प्रवक्ते आणि कुटुंबीयांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, विजयपत सिंघानिया यांच्यावर रविवार 29 मार्च 2026 रोजीअंत्यसंस्कार होणार आहेत. दुपारी 3:00 वाजता चंदनवाडी इथं त्यांच्यावर अंतिम संस्कार (दहनभूमी) केले जातील.
सिंघानिया यांची साहसी कृत्यांसाठीही ओळख : विजयपत सिंघानिया यांच्या नावावर अनेक जागतिक विक्रम होते. 1988 मध्ये, त्यांनी यूके ते भारत असा मायक्रोलाइट विमानाचा एकट्यानं उड्डाण करुन इतिहास रचला. 2005 मध्ये, त्यांनी हॉट एअर बलूनमधून सर्वाधिक उंची गाठण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला, मुंबईचे शेरीफ म्हणूनही काम केलं होते.