सुरगाणा, पेठ, कळवणचे आंदोलनकर्ते जमा होण्यास सुरुवात
दिंडोरी, सुरगाणा : प्रतिनिधी
किसान सभेचे शेतकरी, शेतमजूर व आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता दिंडोरी तहसील व इतर ठिकाणी सुरू असलेले बिर्हाड आंदोलन दिंडोरी येथे सहाव्या दिवशीही सुरूच आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
आता आंदोलनकर्त्यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने सुरगाणा, कळवण, पेठचे आंदोलनकर्ते दिंडोरी येथे जमा होत असून, दिंडोरी तहसील कार्यालय परिसर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे आंदोलनकर्ते नाशिककडून मुंबईकडे रवाना होणार आहेत.
नाशिक जिल्हा किसान सभा, माकपा, डीवायएफएस व जनवादी महिला संघटनांनी शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी दिंडोरी तहसील कार्यालयासमोर सहा दिवसांपासून चक्काजाम आंदोलनाचा विडा उचलला आहे. कडाक्याची थंडी, अंधारी रात्र व दिवसाचे तळपते ऊन अंगावर घेत आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून आहेत. रस्त्यावरच तीन विटांची चूल पेटवून त्यावर खिचडी शिजविली जात आहे. आपले घरदार मागे टाकून आपल्या हक्काच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा ठाम पवित्रा घेतल्याने प्रशासनाची चांगलीच अडचण वाढणार असल्याचे दिसत आहे. याप्रसंगी किसान सभा जिल्हा सेक्रेटरी रमेश चौधरी, माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी देवीदास वाघ, डीवायएफएस जिल्हा सचिव आप्पा वटाणे यांच्यासह किसान सभा समिती, पक्षाचे तालुका समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, आदिवासी बांधव तहसील कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत. सुरगाणा, कळवण, चांदवड आणि पेठ तालुक्यातील हजारो आंदोलक गुरुवारी सायंकाळपर्यंत नाशिकच्या वेशीवर धडकणार आहेत.
Red storm will hit the gates of Nashik
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…