नाशिक

नागरिकांना दिलासा; दोन दिवसांचा शटडाउन मागे

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची व अत्यावश्यक कामे स्मार्ट सिटीमार्फत केली जाणार होती. यासाठी शनिवार व रविवारी (दि.22) दोन दिवस पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार होता. परंतु, सदर कामासाठीचे साहित्य उपलब्ध न झाल्याने प्रस्तावित शटडाउन मागे घेण्यात आल्याची माहिती मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
दरम्यान, दोन दिवस शटडाउन घेण्याचे नियोजित करण्यात आलेले होते. त्यासाठी पाणीपुरवठा विभागामार्फत सर्व सहा विभागांकडून व स्मार्ट सिटीमार्फत करावयाच्या कामांची यादी निश्चित करण्यात आली होती. तथापि गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रापावेतो नव्याने टाकण्यात आलेल्या 900 मी.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याच्या हेतूने अस्तित्वातील जलवाहिनीवर गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे 1200 मि.मी. व्यासाच्या पाइपलाइनवर क्रॉस कनेक्शन करणे हे काम केले जाणार होते. तसेच नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र येथे रॉ वॉटर फाऊंटनकडे जाणार्‍या लाइनवर क्रॉस कनेक्शन करणे त्याचप्रमाणे इतर आवश्यक व अन्य मोठ्या स्वरूपाच्या कामांसाठी आवश्यक साहित्य जागेवर विहित उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे नियोजित शनिवार व रविवारचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला आहे. या कामाचे फेरनियोजन लवकरच करून त्याबाबतची माहिती नागरिकांना दिली जाणार असल्याचे मनपाने म्हटले आहे.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या

कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…

4 hours ago

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

9 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

9 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

9 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

9 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

9 hours ago