तहसीलदार नाईकवाडे : ग्राम महसूल अधिकार्यांच्या लॉगिनवर सुविधा उपलब्ध
निफाड : विशेष प्रतिनिधी
डिजिटल पीक पाहणी प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणींमुळे पीक नोंदणीपासून वंचित राहिलेल्या निफाड तालुक्यातील शेकडो शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रलंबित पीक पाहणी नोंदणी पूर्ण करण्यासाठी संबंधित शेतगटांकरिता सुविधा आता ग्राम महसूल अधिकारी यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या पीक नोंदणीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली आहे.
निफाड तालुक्यात डिजिटल पीक पाहणी सुरू असताना काही तांत्रिक अडचणींमुळे विशिष्ट शेतगटांमध्ये पिकांची नोंदणी करणे शक्य होत नव्हते. परिणामी अनेक शेतकर्यांची पीक पाहणी नोंदणी प्रलंबित राहिली होती. या समस्येमुळे शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. संबंधित शेतकर्यांना पीक नोंदणीपासून वंचित राहण्याची भीतीही निर्माण झाली होती. या गंभीर प्रश्नाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या संबंधित यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तसेच प्रलंबित पीक नोंदणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निफाडचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे व तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी विशेष प्रयत्न केले. या पाठपुराव्याला यश आले असून, संबंधित शेतगटांसाठी सुविधा ग्राम महसूल अधिकारी यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे यापूर्वी तांत्रिक कारणांमुळे पीक पाहणी नोंदणी न होऊ शकलेल्या शेतगटांची नोंदणी आता ग्राम महसूल अधिकार्यांमार्फत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नोंदणीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
डिजिटल पीक पाहणी नोंदणीचा लाभ घ्या
ज्या शेतकरी बांधवांची पीक पाहणी नोंदणी अद्याप प्रलंबित आहे किंवा तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या शेतगटाची नोंदणी होऊ शकलेली नाही, अशा शेतकर्यांनी तातडीने संबंधित ग्राम महसूल अधिकार्यांशी संपर्क साधावा. निफाड तालुक्यातील एकही शेतकरी डिजिटल पीक पाहणी नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा सर्व संबंधित शेतकर्यांनी लाभ घ्यावा असेही नाईकवाडे यांनी स्पष्ट केले आहे.
Relief for farmers regarding crop survey registration!
- डॉ. किशोर पवार उकळत्या पाण्यात केवळ तीन मिनिटे ठेवलेल्या चहाच्या पिशवीतून (टी बॅग) सुमारे…
- रमेश पडवळ - चेतन राजापूरकर नाशिकचा प्राचीन इतिहास केवळ मंदिरे, लेणी आणि शिलालेखांपुरता मर्यादित…
- सीमाताई मराठे अर्थशास्त्र हे केवळ आकड्यांचे खेळ नसते, तर ते सामान्य माणसाच्या ताटातील भाकरीचे…
- राजेश शिरभाते काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष, खासदार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी, इंदिरा…
- अशोक थोरात दुष्काळ, जीवघेणी महागाई यात दिवाळी तर संपली, पण पुढील सहा महिने सर्वांनाच…
विद्यार्थी हा कोणत्याही राष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक विकासाचा महत्त्वपूर्ण आधार असतो. राष्ट्राचे भविष्य…