नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिकरोड न्यायालयात शनिवारी (दि. 11) पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित आणि दाखलपूर्व वर्गवारीतील ठेवण्यात आलेल्या 10,220 प्रकरणांपैकी 148 प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात यंत्रणेला यश मिळाले. निकाली निघालेल्या दाव्यांतुन 4 कोटी 18 लाख 62 हजार 902 रुपये इतका महसूल वसूल झाला आहे.
नाशिकरोड दिवाणी व फौजदारी तसेच मोटार वाहन न्यायालय, विधी प्राधिकरण नाशिक, नाशिकरोड वकील संघातर्फे नाशिकरोड न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात पॅनल क्रमांक 1 मध्ये न्या. एस.एस. देशमुख, पॅनल मेंबर के.एस कातकाडे, पॅनल क्रमांक 2 मध्ये कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्या.ए.एस डागा, माजी न्यायाधीश एस.आर, मालपाणी, पॅनल मेंबर अॅड. प्रतिक पवार, तसेच मोटार वाहन न्यायालयात न्यायाधीश डी.डी. कर्वे आणि अॅड. निकिता जोशी यांनी कामकाज पाहिले. यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयात एकूण 10,220 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 148 प्रकरणे निकाली निघून 4 कोटी 18 लाख 62 हजार 902 रुपये इतका महसूल प्राप्त झाला. तर मोटार वाहन न्यायालयातील 318 प्रकरणे निकाली निघून 13 लाख 11 हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला.
या राष्ट्रीय लोक अदालतीच्या काम काजासाठी नाशिकरोड वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुदाम गायकवाड, अॅड. बी.बी.आरणे, अॅड. अविनाश भोसले, अॅड.उमेश साठे, अॅड. दीपक ताजनपुरे, अॅड.अंकुश निकम, अॅड.विलास ताजनपुरे, अॅड.विश्वास चौगुले, अॅड. गणेश मानकर, अॅड. राजेंद्र लोणे, अॅड. आत्माराम वालझडे, अॅड. योगेश लकारिया, अॅड. प्रिया बावीस्कर, अॅड. कुलदीप यादव, अॅड. एकता आहुजा, अॅड. ब्रिजेश रामराजे, अॅड. रमेश रसाळ, सहाय्यक अधीक्षक ए.एन. बागुल, मनोज मंडाले व इतर कर्मचारी तसेच सर्व सदस्यांचे न्याय यंत्रणेला सहकार्य लाभले.