गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार
नवी दिल्ली :
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक पार पडली. या बैठकीत रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांंची कपात करण्यात आली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली. त्यामुळे रेपो रेटे आता 5.50 टक्के इतका झाला आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्यास बँकांकडून साधारणपणे गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात कपात केली जाते. त्यामुळे फ्लोटिंग रेटने वाहन कर्ज आणि गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांचा महिन्याचा हप्ता कमी होऊ शकतो. तसे घडल्यास सामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. मात्र, आता बँकांकडून तातडीने रेपो रेटमधील कपातीनुसार व्याजदर घटवले जाऊ शकतात का, हे पाहावे लागेल. गेल्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली होती.
सलग तिसर्यांदा व्याजदरात कपात
आरबीआयकडून सलग तिसर्यांदा व्याजदरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जाच्या व्याजदरात कपात होणार आहे. आरबीआयने सीआर रेशोमध्ये 1 टक्क्यांंची कपात केली. कॅश रिव्हर्स रेशो 4 वरून 3 टक्क्यांंवर. महागाई दर आरबीआयच्या टॉलरन्स बॅन्डच्या खाली, 4 टक्क्यांच्या खाली राहणार महागाई दर.
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…
श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील…