– इंजि. रोहित काकळीज
गेली अनेक वर्षे विकासापासून कोसो दूर असलेला आणि दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा नांदगाव तालुका आज विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. तालुक्याला सर्वांगीण विकासाच्या उंबरठ्यावर आणून ठेवणारे नेतृत्व म्हणजे आमदार सुहास (अण्णा) कांदे. गेल्या पन्नास वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत त्याहून अधिक निधी आणि प्रकल्प आमदार कांदे यांनी नांदगाव मतदारसंघासाठी खेचून आणले आहेत.
राजकारणापुरते मर्यादित न राहता, आपला-परका असा कोणताही भेदभाव न करता मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्या त्वरित सोडवणे, ही त्यांची कार्यशैली राहिली आहे. कार्यकर्त्यांमधील मध्यस्थी किंवा पीए संस्कृती मोडीत काढत त्यांनी सर्वसामान्य जनतेला थेट आपल्याशी जोडले. यामुळेच नागरिक आपल्या समस्या एका कुटुंबप्रमुखाकडे मांडल्यासारख्या नि:संकोचपणे मांडतात. जनतेने दाखवलेला हाच विश्वास त्यांच्या सलग दुसर्यांदा झालेल्या दणदणीत विजयातून सिद्ध झाला आहे.
नांदगाव आणि मनमाड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा अनेक दशकांपासूनचा कळीचा मुद्दा होता. यापूर्वी अनेक निवडणुका या प्रश्नावर लढवल्या गेल्या; परंतु तो सोडवण्यात पूर्वीच्या लोकप्रतिनिधींना यश आले नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार कांदे यांनी हा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्याचा शब्द दिला होता. जनभावनेचा आदर करत त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि मतदारसंघाला या समस्येतून बाहेर काढले.
मतदारसंघातील प्रत्येक गावात रस्त्यांचे जाळे, वीज, सांडपाण्याची व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि शेतीसिंचनासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. पायाभूत सुविधांच्या या बळकटीकरणामुळे तालुक्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. आपल्या मतदारसंघाचा कुटुंबप्रमुख ही जबाबदारी अत्यंत निष्ठा आणि ताकदीने पार पाडणारे आमचे मार्गदर्शक आमदार सुहास (अण्णा) कांदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आई तुळजाभवानी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य आणि तालुक्याच्या सेवेसाठी अफाट शक्ती देवो, हीच प्रार्थना!
Resolute leadership that accelerates development: MLA Kande