गतवर्षीपेक्षा 27 कोटींची सरप्लस वसुली
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या करवसुलीला मिळकतदारांचा प्रतिसाद मिळत असून, 1 एप्रिल ते 19 जुलै या साडेतीन महिन्यांत घरपट्टी व पाणीपट्टी कराची 148 कोटींची वसुली करण्यात यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, गतवर्षापेक्षा 27 कोटींची सरप्लस वसुली या आर्थिक वर्षात झाली आहे. कर संकलन विभागाला 2026-27 या आर्थिक वर्षात घरपट्टीची 225 कोटी व पाणीपट्टीची 75 कोटी नियमित करवसुलीचे उद्दिष्ट दिले असून, त्यापैकी पन्नास टक्के वसुली साडेतीन महिन्यांतच झाली असून, यंदा विक्रमी करवसुली होण्याचा अंदाज आहे.
घरपट्टीची 126 कोटी 66 लाख तर पाणीपट्टीची 22 कोटी 8 लाखांची वसुली झाली आहे. नाशिक महापालिकेने राबविलेल्या कर सवलत योजनेला शहरातील मिळकतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याचे यावरून दिसत आहे. यंदा कर संकलनच्या कर्मचार्यांवर जणगणनेसह मतदार पुनर्रचना कामाचा अतिरिक्त बोजा असूनही ते कर वसुलीचे काम चोख बजावत आहेत. शहरातील मिळकतदारांसाठी महापालिका दरवर्षी कर सवलत योजना आणत असते. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ही सूट दिली जाते. दरम्यान, सवलतीची मुदत संपुष्टात येऊनही करवसुलीला मिळकतदारांचा प्रतिसाद मिळताना दिसतोय. आयुक्त मनीषा खत्री यांनी कर संकलन विभागाला 2026-27 वर्षाकरिता साडेतीनशे कोटींचे
टार्गेट दिले आहे. कर विभागाला चालू मागणीसह वर्षानुवर्षे रखडलेल्या थकबाकी वसुलीचे आव्हान असते. महापालिकेसमोर तब्बल सहाशे कोटींहून अधिक थकबाकी वसुलीचे आव्हान आहे. दरम्यान, करसंकलन दरवर्षी थकबाकी असणार्यांच्या मालमत्तेवर जप्तीची मोहीम हाती घेते. मनपाच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत घरपट्टी व पाणीपट्टीतून मिळणारा कर आहे. त्यातून मिळणार्या रकमेतून रस्ते, पाणी, उद्यान आदी मूलभूत सुविधांची कामे केली जातात.
मिळकतदारांनी त्यांच्याकडील घरपट्टी, पाणीपट्टी भरून सहकार्य करावे. ज्यांच्याकडे वर्षानुवर्षे थकबाकी आहे, अशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– नितीन पवार, उपायुक्त, मनपा, कर संकलन
विभागानुसार घरपट्टीची वसुली
विभाग वसुलीची रक्कम
सातपूर 15 कोटी 23 लाख
नाशिक पश्चिम 20 कोटी 97
नाशिक पूर्व 20 कोटी 10 लाख
पंचवटी 23 कोटी 45 लाख
नवीन नाशिक 26 कोटी 74 लाख
नाशिकरोड 20 कोटी 14 लाख
एकूण 1226 कोटी 66 लाख 7 हजार
Response from property owners; ₹148 crore collected.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik