आमदार सरोज आहिरेंची लक्षवेधी
नाशिक : प्रतिनिधी
देवळाली मतदारसंघातील विहितगाव, बेलतगव्हाण, मनोली गावांतील शेतकर्यांच्या जमिनींची दस्तनोंदणी होत नसल्याने या प्रकरणी आमदार सरोज आहिरे यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडत शासनाने तत्काळ दस्तनोंदणी पूर्ववत करण्याची मागणी केली. दस्तनोंदणी होत नसल्याने मतदारसंघातील शेतकर्यांमध्ये संभ्रम असून, तो करण्यासाठी दस्तनोंदणी पूर्ववत करण्याची मागणी आ. आहिरे यांनी केली.
आ. आहिरे यांनी म्हटले की, उच्च न्यायालयाने पारित केलेल्या निर्णयानुसार देवस्थान वतन जमिनीच्या पत्राचे शुद्धिपत्रक करून महसूल देवस्थान इनाम जमिनीची म्हणजेच ग्रॅट ऑफ रेव्हेन्यू प्रकारच्या दस्त नोंदणीचे काम पूर्ववत करण्याचे तत्काळ आदेश देण्याची अग्रणी मागणी केली. राज्याचे 30 जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून, गुरुवारी (दि.3) देवळाली मतदारसंघातील आ. आहिरे यांनी दस्तनोंदणीच्या मुद्याला हात घालत काही दिवसांपासून शेतकर्यांना दस्तनोंदणीच्या येणार्या अडचणी विधिमंडळाच्या सभागृहात मांडत या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली. विहितगाव, मनोली, बेलतगव्हाण शेतजमिनी महसूल देवस्थान इनामी घोषित असताना, त्यांची दस्तनोंदणी होत नसल्याच्या शेतकर्यांकडून तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे दस्तनोंदणीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याकरिता शासनाने 12 मार्च 2024 चे अवलोकन करून दस्तनोंदणी पूर्ववत करण्याची आवश्यकता आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की, उच्च न्यायालयाने देवस्थान इनामबाबत एक आदेश दिला आहे. यामध्ये आपण देवस्थान इनाम जमिनीबाबत सभागृहात एक कायदा आणतोय. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाने काय करता येईल ते आपण करणार आहोत. याप्रश्नी काही दिवसांपूर्वी आ. सरोज आहिरे यांच्याशी बैठक घेऊन चर्चाही झाली असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी म्हटले.
विहितगाव, मनोली, बेलतगव्हाण गावांतील शेतकर्यांनी यापूर्वी आपल्याकडे दस्तनोंदणी होत नसल्याची समस्या आपल्याकडे मांडली होती. या प्रश्नी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बैठक झाली होती. त्यानंतर अधिवेशनात याबाबतची समस्या मांडून शासनाने लवकर लक्ष घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे लवकरच यावर तोडगा निघेल.
-आ. सरोज आहिरे, देवळाली मतदारसंघ
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…