अबब.. घर खरेदीतून मिळाला इतका महसूल

नाशिक : अश्‍विनी पांडे
स्वत:चे एक घरकुल असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, कोरोनाच्या दोन वर्षांत अर्थव्यवस्था मंदावली होती. तथापि, कोरोनानंतर आता बाजारानेही कात टाकली आहे. दिवसागणिक वाढत जाणार्‍या जमिनी आणि घरांचे भाव पाहता नागरिक आता गृहखरेदीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात एक लाख 37 हजार 667 दस्त नोंदणी झाले आहेत.
कोरोनानंतर स्वत:चे घर खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. वर्षभरात दस्त नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे शासनाच्या महसुलात भर पडली आहे. वर्षभरात 1 लाख 37 हजार 667 दस्त नोंदणी झाले आहेत. 1064.32 कोटीचा महसूूल प्राप्त झाला. त्यामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.पहिल्या घरासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून 2. 67 लाख रूपयांचे अनुदान मिळत आहे. त्यामुळे गृहखरेदी करण्याकडे कल वाढला आहे. तर अवघ्या मार्च 2022 मध्ये तब्बल 16 हजार 894 दस्त नोंदणी झाले.त्यातून सरकारला 185.76 कोटी इतका महसूल प्राप्त झाला आहे.
महिना एकूण दस्त संख्या वसुली
एप्रिल 2021 6970 12.02कोटी
मे 2021 4229 19.22कोटी
जुन 2021 13042 5%.2 कोटी
जुलै 2021 14165 80.46 कोटी
ऑगस्ट 2021 12374 86.5%कोटी
सष्टेबर 2021 12090 89.15कोटी
ऑक्टॉवर 2021 10247 95.8%कोटी
नोव्हे 2021 10532 77.09कोटी
डिसेंबर 2021 13024 148.36कोटी
जाने 2022 10809 99.68कोटी
फेब्रु 2022 13301 109.99कोटी
मार्च 2022 16894 185.76कोटी
एकूण 137667 1064.32 कोटी
( 30 मार्च अखेर ) 102.63 7कोटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *