दिंडोरीत अवकाळीचा तडाखा

दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील मडकीजांब,रासेगाव,  उमराळे,जांबुटके, निळवंडी या गावांना वादळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. पावसामुळे द्राक्ष,गहु, कांदा आदींसह शेतीमालाचे नुकसान झाले आहे. अचानक वादळी वा-यासह आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. वादळामुळे निळवंडी येथे भोपळ्याचा बाग कोलमडून पडला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब पडल्याने मडकिजांब, इंदोरे या गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *