दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यासह सुरगाणा पेठ व इतर ठिकाणी अवकाळी पावसाने सलग दोन ते तीन दिवस हलक्या ते दमदार पावसाने शेत पिकांचे नुकसान केले आहे मात्र अवकाळीचा द्राक्षबागांना फटका न बसता द्राक्ष बागांना संजीवनी मिळाली आहे,
कारण की, झाडावरील असलेल्या फुटव्याची अवकाळीनं तर झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसुन येत येत असून द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या दिंडोरी व चांदवड आणि निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना एप्रिलच्या खरड छाटणीनंतर एकसारखा जोमदार
फुटवा व्हावा, यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी चांगली दमछाक होत असते,
जर पाणीटंचाईमुळे एक सारखा फुटवा न होता मागेपुढे फुटवा झाला आणि सगळी काडी चांगली परिपक्क झाली नाही तर पुढील वर्षाच्या सरासरी व जोमदार निघणार्या द्राक्ष मालासाठी धोक्याची घंटा मानली जात असते,पण चालूवर्षी एप्रिल व मे महिन्यात कड़क उन्हाळ्यासोबतच चांदवड निफाड व येवला तालुक्यात सर्वत्र पाणी टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे पहावयास मिळत होते, त्यातच मागील महिन्यात पुणेगाव धरणातून चांदवड, येवल्याच्या कालव्यावरील लाभार्थ्यांसाठी पाणी सोडण्यावरून पाटबंधारे विभागाच्या अधिकारी वर्गाशी शेतकर्यांचे किरकोळ वादसुद्धा झाल्याचे पहावयास मिळत होते. परंतु जरी एकीकडे समाधान मानन्यासारखे असले तरी मात्र तिन्ही
तालुक्यांतील अवाढव्य खर्च करून पिकविलेला कांदा आणि बाजारभावात सततच्या होणार्या चढउतारामुळे उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आल्याचे दुःखसुद्धा डोंगराएवढे असल्यापेक्षा कमी म्हणता येणार नाही. म्हणजे काही घरी पुरणपोळी तर काहींच्या दारी दुखःची होळी असे उद्गार शेतकर्यांच्या तोंडून ऐकावयास मिळत
आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…