महाराष्ट्र

सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये कॉस्ट अकाउंटंटची भूमिका

CMA Amit Jadhav
Chairman
ICMAI | Nashik Chapter
ACMA, BE Mechanical, MBA – Supply Chain, MBA – Marketing
सध्याच्या वाढत्या स्पर्धेच्या युगामध्ये  प्रत्येक कंपनी *स्वस्त पण टिकावू* उत्पादन किंवा सेवा कशा प्रकारे त्यांच्या ग्राहकांसाठी घेऊन येता येईल ह्याचा विचार करत असते. ह्या सगळ्या तारांबळात त्यांना त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागत असते.
मग प्रश्न येतो की गुणवत्ते ला धक्का न लागू देता, कंपनी चा निव्वळ नफा कमी न करता मूळ उत्पादन खर्च कमी करणे.
आणि ह्या ठिकाणी कॉस्ट अकाउंटंट ची भूमिका महत्वाची बनते. सध्याच्या ह्या स्पर्धेच्या युगात कॉस्ट अकाउंटंट का कंपन्यानंसाठी आशेचा किरण घेऊन येतं असतो. आणि त्याचे महत्व हे कंपन्यांना ही एव्हाना समजायला लागले आहे.
ह्या सगळ्यांमध्ये कॉस्ट अकाउंटंन्ट Supply Chain मध्येही मोठं योगदान देऊ शकतो व त्याचा उपयोग हा वस्तूची अथवा सेवेचा उत्पादन खर्च कमी करण्यात होतं असतो.
Supply chain मध्ये कॉस्ट अकाउंटंटचा मोठा उपयोग होतो. कॉस्ट अकाउंटंटच्या कौशल्यांचा उपयोग करून, कंपनीला खर्चाचे व्यवस्थापन आणि ऑप्टिमायझेशन करण्यात मदत होते. कॉस्ट अकाउंटंट supply chain च्या विविध टप्प्यांवर खर्चाचे विश्लेषण करतात आणि खर्च कमी करण्याच्या उपाययोजना सुचवतात.
त्यांच्या कामांमध्ये समाविष्ट आहे:
खर्चाचे विश्लेषण  मालाच्या खरेदीपासून ते वितरणापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यांवरील खर्चाचा अभ्यास करणे. Purchase, Inventory, FG Store, सर्वात जलद पण स्वस्त अशी वाहतूक सेवा अश्या बऱ्याच गोष्टींमध्ये कॉस्ट अकाउंटंट सक्रिय सहभाग नोंदवू शकतो.
Inventory Management :* बऱ्याचश्या कंपन्या ग्राहकांना वस्तू / सेवा देण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांचे खेळते भांडवल अडकवून बसतात. स्टॉक किती हवा आणि किती नसावा ह्यामध्ये एक बारीकशी रेखा असते. Inventory वर असलेला अंकुश हा supply chain मधला सर्वात crucial असा पॉईंट आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेत मध्ये कॉस्ट अकाउंटंट भरपूर योगदान देत असतो.
*बजेटिंग :* कुठलीही गोष्ट बजेटिंग शिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही. Purchase, Sales , विक्रीसाठी तयार असलेला माल ठेवण्यासाठी गोदाम ह्या सर्व गोष्टी budget शिवाय पूर्ण होणे अवघड. सप्लाय चेन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यासाठी बजेट तयार करणे हा ही कॉस्ट अकाउंटंन्ट चा महत्वाचा कार्यभाग असतो.
*किंमत निर्धारण:* योग्य वस्तू ही माफक दरात योग्य बाजारपेठेत जर उपलब्ध असेल तर उत्पादकांना नफा हा नक्कीच चांगला होतो. परंतु त्या नफ्याची व्याप्ती ही तिच्या किमतीवर ठरत असते. त्यामुळेच उत्पादनाची योग्य किंमत ठरवण्यासाठी खर्चाचा अंदाज बांधणे ही कॉस्ट अकाउंटंन्ट चा महत्वाचा कार्यभाग असतो.
*कामगिरी मापन:** कुठल्याही गोष्टीचे मूल्यमापन केल्याशिवाय त्या गोष्टीचे business मधील असलेले महत्व आणि criticality समजत नसते. म्हणूनच सप्लाय चेनमध्ये विविध घटकांच्या कार्यक्षमता मापनासाठी मेट्रिक्स तयार करणे हे ही कॉस्ट अकाउंटंट च्या दृष्टीने महत्वाचे होऊन बसते.
6. *मार्जिनल कॉस्टिंग :* हे एक असे बहुमूल्य साधन आहे ज्याचा उपयोग करून किंमत, प्रॉडक्ट मिक्स आणि नफा ह्याची योग्य तर्हेने सांगड घालता येते. ह्यामध्ये वेरीएबल कॉस्ट ही फिक्स कॉस्ट मधून वेगळी करून त्याचा उत्पादनावर कशा प्रकारे फरक पडतो ते management ला निर्णय घेण्याचा अंदाज येतो.
*कमी करण्यायोग्य खर्च शोधणे:* सध्या आपण सर्वांच्या आयुष्याशी निगडतीत असलेला शब्द म्हणजे *कॉस्ट कटिंग*. अधिक खर्च कमी करण्यासाठी उपाय सुचवणे आणि कार्यान्वयन करणे ह्या साठी कॉस्ट अकाउंटंट हा नेहमीच तत्पर असतो.
तर एकंदरीत कॉस्ट अकाउंटंन्ट च्या असण्याने सप्लाय चेन अधिक कार्यक्षम आणि नफा देणारी बनते. आणि आता कंपन्यांना ही त्याचे महत्व समजायला लागले आहे ज्यामुळे कंपन्यामध्ये कॉस्ट अकाउंटंट ला असलेली मागणी ही वाढताना दिसते आहे.
Devyani Sonar

Recent Posts

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

1 hour ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

1 hour ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

12 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

19 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

20 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

20 hours ago