नाशिक : प्रतिनिधी
व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर देशभरात गुलाबाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम फुलबाजारातील दरांवर दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अवघ्या दहा रुपयांना मिळणारा साधा गुलाब सध्या 50 ते 60 रुपयांपर्यंत विकला जात आहे. प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणार्या गुलाबाला या काळात विशेष मागणी असते. त्यामुळे नाशिकसह राज्यातील फुलबाजार तेजीत आला आहे.
गुलाबाचा वापर केवळ प्रेम व्यक्त करण्यासाठीच नव्हे, तर लग्नसमारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम, पूजाविधी, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणावर केला जातो. 14 फेब्रुवारी रोजी साजर्या होणार्या व्हॅलेंटाइन डेमुळे गुलाबाच्या खरेदीत मोठी वाढ झाली असून, ग्राहकांकडून यंदा टॉप सिक्रेट, तसेच पॉलिहाउसमध्ये उत्पादित गुलाबांना अधिक पसंती दिली जात आहे, अशी माहिती फूल विक्रेत्यांनी दिली.
सध्या बाजारात साध्या गुलाबाचा 12 फुलांचा बंडल 150 ते 200 रुपयांना विकला जात आहे. पॉलिहाउस रेड रोझचा 20 फुलांचा बंडल 500 ते 600 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पॉलिहाउस रंगीत गुलाबाचा 20 फुलांचा बंडल 700 ते 800 रुपयांपर्यंत विकला जात आहे. याशिवाय जर्बेरा, कार्नेशन, ऑर्किड यांसारख्या इतर फुलांच्या किमतींतही वाढ झाल्याचे दिसत आहे.
विश्वकर्मा फ्लॉवर डेकोरेटर्सचे भूषण गायकवाड यांनी सांगितले की, सध्या लग्नसराई, व्हॅलेंटाइन वीक, विविध धार्मिक कार्यक्रम, तसेच हवामानातील बदल यांचा फूल उत्पादनावर परिणाम झाला आहे. वाढत्या मागणीच्या तुलनेत पुरवठा मर्यादित असल्याने गुलाबासह सर्वच फुलांच्या किमतींत लक्षणीय वाढ झाली आहे. पुढील काही दिवस गुलाबाचे दर असेच चढे राहण्याची शक्यता फुलबाजारातील व्यापार्यांनी व्यक्त केली.
Rose prices hit by Valentine’s Day
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…