नाशिक

‘सचेत’ अ‍ॅप देणार आपत्तीची माहिती

अ‍ॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन

नाशिक : प्रतिनिधी
नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती मिळावी यासाठी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मसचेत’ हे अ‍ॅप सुरू करण्यात आले.
या अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाइलवर एका क्लिकवर आपल्या शहरातील वातावरणाची अपडेट मिळणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आपत्तीविषयी सूचना देणारे अ‍ॅप असून, ठराविक मिनिटांनंतर वापरकर्त्यांना माहिती देणारा संदेश प्राप्त होणार आहे. अ‍ॅप सुरू करण्यात येऊन दोन वर्षे झाली, तरी नागरिकांना अ‍ॅपसंदर्भात माहिती नसल्याने खूप कमी जण या अ‍ॅपचा वापर करतात.
ही बाब लक्षात घेत काही दिवसांपूर्वी झालेल्या ममन की बातफमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांनी सचेत अ‍ॅपचा वापर करत वातावरणासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेत सतर्क राहावे, असेे आवाहन केेले होते.
सचेत अ‍ॅप स्मार्टफोनच्या जीपीएस लोकेशनचा वापर करून अलर्ट पाठवतो. अ‍ॅप वार्‍याचा वेग, पाऊस व तापमान यांचे सतत निरीक्षण करत असते. आपत्तीची शक्यता असल्यास सूचनांद्वारे तत्काळ अ‍ॅपवरून इशारा देण्यात येतो. सर्व सूचना अधिकृत सरकारी स्रोतांकडून येतात. जर आपत्ती आली असेल, तर त्या ठिकाणी काय करावे किंवा काय करू नये, याबद्दलची सर्व माहिती अ‍ॅपवर देण्यात येते. हे अ‍ॅप जीपीएस सिस्टिमवर कार्य करेल.

     सचेत अ‍ॅपविषयी
Ο रियल टाइम लोकेशनच्या आधारे नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वी अलर्ट पाठवून सावध करते.
Ο पूर, चक्रीवादळ, त्सुनामी, वादळ व वीज पडण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीचे अलर्ट.
Ο इंग्रजी, हिंदीसह प्रादेशिक भाषा अ‍ॅपमध्ये उपलब्ध.
Ο सचेत अ‍ॅप प्ले-स्टोअरवर उपलब्ध.
Ο मोफत माहिती देणारे अ‍ॅप.
Ο ऊन, पाऊस याविषयीचे सतर्कतेविषयीची अ‍ॅपवर माहिती.
Ο कोणत्याही मोबाइलवर अ‍ॅपची सुविधा उपलब्ध.

 

सर्वच नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करून घ्यायला हवे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकृत अ‍ॅप आहे.

अ‍ॅपवर मोफत वापरकर्त्यांना नैसर्गिक आपत्तीसह उष्णतेची लाट व

पावसासंदर्भात माहिती देणारे संदेश प्राप्त होणार आहेत.

अधिकृत अ‍ॅप असल्याने वापरकर्त्यांना खरी व वस्तुनिष्ठ माहितीच अ‍ॅपवर मिळणार आहे.

श्रीकृष्ण देशपांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

Gavkari Admin

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

12 hours ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

12 hours ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

12 hours ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

13 hours ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

13 hours ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

13 hours ago