सदासुखी
माणसांचा स्वभावच असा आहे कि सर्व असले तरी कसली तरी उणीव भासण्याचा आणि समाधानी नसण्याचा. निसर्गानं प्रत्येकाला काही ना काही चांगली चमक दिलेली आहे.
त्याच बरोबर काही कमीपण ठेवले आहे. अपुर्णपणात सुध्दा काही दडलेले असते. फक्त याचा शोध आपली तुच्छ बुध्दी घेऊ शकत नाही….
काही गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात कमी ठेवलेल्या आहेत. नाही तर निसर्गाची अन् दैवी शक्तीची गरजच माणसाला कधीच राहिली नसती.
माणुस सदैव मोहात, स्वार्थात, विवंचनेत, व्देष, लोभ लाचारी अशा असंख्य गोष्टींमध्ये अडकलेला आहे. तेही अगदी पुर्वी पार पासुन ह्या गोष्टी जणू काही दत्तकच मिळाल्या आहेत फक्त मनुष्य जातीला…
प्रत्येक व्यक्तीला सुखाची आस आहे. सुख नक्की काय आणि ते कशात आहे. ते मिळवण्यासाठी काय करायला हवे याची सद्बुद्धी सगळ्यांकडे नसते.
काही व्यक्ती दुसऱ्याला अडचणीत आणुन सुखी होतात तर काही व्यक्ती कुणाला अडचणीतुन बाहेर काढून. काही व्यक्ती ठायी सगळ्यांच्या सुखाचा विचार असतो तर काही ठायी फक्त षडरिपु.
त्या दैवी शक्तीने खरं तर सगळ्यांच्या प्रारब्धात सुख लिहिलेलं असतंच. फक्त त्यासाठी आपल्याला प्रयत्नांप्रती अढळ रहावं लागतं त्यात सातत्य ठेवावे लागते तेही अपेक्षा विरहित!!!
निसर्ग कधी माणसांसारखा भेदभाव करत नसतो. फक्त सुखाच्या आगमनाची वेळ मात्र तो निश्पक्षपाती पणाने ठरवत असतो. त्याच्या ठायी सदैव सर्व समानच असतात.
या जगात असंख्य प्रकारची लोक आहेत. पुर्वीपासुन आपल्याकडे खुप तर्हेच्या म्हणी प्रचलित आहे. त्यातीलच एक अशी की निर्लज्जम सदासुखी…पण खरंच लाज सोडून माणुस सदासुखी राहु शकतो का???
या जगात वावरताना सगळ्यात जास्त त्रास हा सरळ वागणाऱ्यालाच होतो. हेकेखोर, नंगट, गर्विष्ठ आणि लाज सोडलेल्या व्यक्तीच्या नादाला देवसुद्धा लागत नाही…
तुम्ही चांगले वागा अथवा वाईट वागा. हे विश्व तुम्हाला कसे, कुठल्या दृष्टीने पाहिलं हे कुणीच सांगू शकत नाही. ज्यांच्या दृष्टीतच दोष असतो त्यांना चांगल्या गोष्टी दिसणं अशक्य आहे.
सुखाची व्याख्या कुणालाच कळलेली नाही. सुख हे मृगजळासारखे आहे. ते हाताला लागत नसल्याने आणि मानवी स्वभाव समाधानी आणि अनंत आशांनी भरल्यामुळे सुख उपभोगता येत नाही…
जगी सर्व सुखी असा कोण आहे.
विचारी मना तुच शोधुन पाहे.
संत रामदास स्वामींचा हा किती महान श्लोक आपल्याच मनानं आपल्याच सुखाचा किंबहुना जगात कोण खरचं किती सुखी आहे याचा शोध घेणं किती हा विराट आणि विलक्षण विचार!!!
जनसामान्यान खरं तर अधीर स्वभावामुळे निराशेला सामोरे जातात. तुप खाऊन जसे लगेच रुप येत नसते तसेच एकाच प्रयत्नात सुख कसे मिळेल…
सदासुखी राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न आणि अपेक्षा विरहित परिणाम स्विकारण्याची मनाची तयारी असावी लागते. अश्याच व्यक्ती सुखाची हक्कदार असतात!!!
इतरांकडून झालेला अपेक्षाभंग हेच माणसाचे आयुष्यातील सर्वात मोठे दुःख…खरं तर अपेक्षाभंग म्हणजे न भरलेली, न दिसणारी, भावनेच्या रक्तान माखलेली, हृदयाला वेदना देणारी अदृश्य जखम आहे..
यावर फक्त एकच उपाय अपेक्षा विरहित जीवन जगणं… माहित नाही की सुखी राहण्यासाठी कुठला मुलमंत्र आहे का??? पण अपेक्षा विरहित आणि सातत्याने प्रयत्न तेहि परिणामांची काळजी न करता, सरळ, साधं आयुष्य जगणाऱ्या प्रत्येक व्यक्ती सदासुखी आहे असेच म्हणावे लागेल.
कारण जगानं जरी सरळ साधं आयुष्य जगणाऱ्यांना विक्षिप्त वागणूक देऊन त्यांचे मार्ग बंद केले तरी निसर्गाची शक्ती अफाट, प्रचंड आणि अनाकलनीय आहे. त्याने उघडलेल्या मार्ग कुणीही बंद करू शकत नाही. हे मात्र बावनकशी सोन्यासारखं खरं !!!
© सौ. श्रध्दा जाधव बोरसे
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…