मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर शुक्रवारी दुपारी संपकरी एसटी कर्मचार्यांनी केलेल्या हल्लाबोलनंतर याप्रकरणी कर्मचार्यांचे वकिल गुणरत्न सदावर्ते यांना रात्रीच अटक केली होती. काल त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची कोठडी देण्यात आली. यावेळी न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या चिथावणीखोर भाषणामुळेच कर्मचार्यांनी हा हल्लाबोल केल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला.
सिल्व्हर ओक
वकिल प्रदीप घरत यांनी सरकारची बाजू न्यायालयात मांडली. गुणरत्न सदावर्ते यांच्या भाषणांचा उल्लेख त्यांनी न्यायालयात केला. भाषणात सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका आणि चिथावणीखोर भाषणाचाही युक्तिवादात विधिज्ञ घरत यांनी उल्लेख केला. सदावर्ते यांनी आंदोलकांची माथी भडकावण्याचे काम आहे असेही त्यांनी न्यायालयात सांगत या हल्ल्यात पोलिस जखमी झाले त्यामुळे सदावर्तें यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली. मात्र, सदावर्ते यांचे वकिल वासवानी यांनी या कोठडीला विरोध केला. सदावर्ते घटनास्थळी नव्हते, सीसीटीव्हीतही ते दिसत नाहीत त्यांचा या प्रकरणाशी संबंधच नाही. पण गृहमंत्र्यांविरूद्ध तक्रार केल्याने या प्रकरणात सदावर्ते यांना गोवण्यात आले. पोलिस जखमी झाले तर त्यांचा अहवाल न्यायालयात सादर का झाला नाही असा सवालही वासवानी यांनी करीत न्यायालयापुढे आपली बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर दोन दिवसांची कोठडी सुनावली.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…
View Comments