नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला साधू आखाड्यांचा प्रारंभ

अटल आखाड्याची बैठक संपन्न, ठाणापतिपदी दीपेंद्रगिरी महाराज

 


त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर येथील श्री शंभू पंचायती अटल आखाड्यातील प्रमुख साधू-महंतांची बैठक आगामी कुंभमेळा 2026-27 नियोजनाच्या दृष्टीने शनिवारी (दि.14 जून) आयोजित करण्यात आली होती. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणारे साधू- महंत व भक्त यांच्यासाठी सोयीसुविधा निर्माण करणे, कुंभमेळा संपन्न करताना तो पर्यावरणाला घातक होणार नाही किंबहुना त्यानिमित्ताने वनराई वाढवण्यास मदत करणे यांसारख्या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
अटल आखाड्याची इष्ट देवता गणेश भगवान आहेत. 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थीला त्र्यंबकेश्वर येथील अटल आखाड्यात उत्सव आयोजित केला आहे. या उत्सवासाठी आखाड्याच्या प्रमुख साधू-महंतांची उपस्थिती लाभणार आहे. गणेश चतुर्थीपासून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रत्यक्ष तयारीला सुरुवात करण्यात येणार आहे. यात आखाड्याच्या जागेत साधू- महंतांसाठी सोयीसुविधा उभारणीस प्रारंभ होणार आहे.
शनिवारी (दि.14) झालेल्या बैठकीत त्र्यंबकेश्वर अटल आखाड्याच्या ठाणापती पदावर दीपेंद्रगिरी महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रह्मलीन उदयगिरी महाराज यांचे ते शिष्य आहेत.
यासोबत कुंभमेळा संपन्न करण्यासाठी श्रीमहंत मंगत पुरी व सचिव बटुकगिरी यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कुंभमेळ्यांदर्भात ते कामकाज पाहतील,असे जाहीर करण्यात आले.
या बैठकीसाठी आखाड्याचे सेक्रेटरी श्रीमहंत सत्यमगिरी महाराज यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यावेळी सचिव सनातन भारती, सचिव पवन गिरी, सचिव सुंदर गिरी, श्रीमहंत प्रमोद गिरी, श्रीमहंत गोविंद गिरी, श्रीमहंत सतीश गिरी, महंत पद्मनाभ गिरी, श्रीमहंत आनंद गिरी महाराज यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
श्री शंभू पंचायती अटल आखाडा, संत निवृत्तिनाथ मंदिराच्या मागे, गंगाद्वार पायथ्याला आहे. येथे म्हाळसादेवीचे मंदिर आहे. या आखाड्याचे ब्रह्मलीन महंत उदयगिरी महाराज यांनी यापूर्वी कामकाज सांभाळले होते. त्यांचे निर्वाण झाल्याने नव्याने पदाधिकारी नियुक्ती झाली आहे. यापुढे आखाड्यांतर्गत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग येणार असल्याचे दिसते.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

10 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

10 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

11 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

11 hours ago