आखाडा परिषदेचे सागरानंद सरस्वती यांचे देहावसान
त्र्यंबकेश्वर: आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष सगरानंद सरस्वती यांचे आज देहावसान झाले, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती, अन्न पाण्याचा त्याग केला होता.
श्री महंत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास ब्रम्हलिन झाले. त्यांनी वयाची शंभरी पार केली होती. त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा १९६८,१९८०,१९९२ ,२००३ व २०१५ असे पाच कुंभमेळा त्यांच्या मार्गदर्शनाने संपन झाले.
अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषद अध्यक्ष होते. अत्यंत मनमिळावू शांत संयमी साधू म्हणून ते सर्वदूर परिचित होते.प्रत्येक कुंभमेळ्यात त्यांनी शासन अधिकारी आणि साधू यांच्यात समन्वय साधला.
आयुर्वेदाचा त्यांचा गाढा अभ्यास होता.लाखो रुग्णावर त्यांनी निःशुल्क उपचार केले.त्यांचे हजारो शिष्य आहेत.प्रापंचिक साधकांनी त्यांची गुरुदिक्षा घेतली आहे.गुरुपौर्णिमा असेल तेव्हा त्यांच्या गणपतबारी आश्रमात यात्रेचे स्वरूप येत असायचे.
आज सायंकाळी चार वाजता रींगरोड येथील आनंद आखडा गजलक्ष्मी मंदिर येथे दुपारी चार वाजता समाधी देणार आहेत.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…