पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्कचा कानाडोळा
दिंडोरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील कोचरगाव येथे अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू असून, गावात नऊ ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू आहे. याविरोधात येथील महिलांनी पोलीस ठाणे गाठत उपनिरीक्षक किसन काळे यांना निवेदन देत दारूबंदी करण्याची मागणी
केली.
गावातील अनेक तरुण दारूच्या आहारी जाऊन आपल्या जिवाला मुकले आहेत. दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. गावातील दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी दिंडोरी येथे पोलीस ठाणे गाठत दारूबंदीची मागणी केली. यावेळी सरपंच कल्पना टोंगारे, उपसरपंच गोरखनाथ लिलके, पोलीसपाटील सीता टोंगारे, अलकाबाई खाडे, मंजुळा निंबेकर आदींसह महिला उपस्थित होत्या.
दिंडोरीच्या पश्चिम भागात दारू विक्रीची दुकानेच नाही. तरीही अवैध दारू विक्री करणार्यांकडे दारूचे बॉक्स येतातच कसे, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकानदार बॉक्स विक्रीची परवानगी दिली तर नाही ना? असा प्रश्न यावेळी महिलांनी उपस्थित केला. दारूबंदी करण्याचे गावाने ठरविले आहे. दारू विक्री करणार्या महिलांनी नऊ दारू विक्रेत्याची नावे दिली आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलीस उपनिरीक्षक किसन काळे यांनी सांगितले.
अन्यथा उपोषणास बसणार
आजपर्यंत दिंडोरी पोलिसांना दोनदा निवेदने दिली. नाशिक ग्रामीण पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना निवेदन दिले, मात्र गावात राजरोसपणे अवैध दारूविक्री सुरू आहे. आज दिलेल्या निवेदनावर कारवाई झाली नाही तर नागरिक उपोषणाला बसतील.
– कल्पना टोंगारे, सरपंच, कोचरगाव
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…
वाहनचालकांसह नागरिक त्रस्त; खासदारसाहेब, आम्हाला या जाचातून मुक्त करा! मनमाड : प्रतिनिधी दुष्काळी अन् पाणीटंचाई…
दहमहा वीजबिलात दुप्पट, तिप्पट वाढ; ग्राहकांमध्ये संतापाची भावना निफाड : तालुका प्रतिनिधी वीज वितरण कंपनीकडून…