नाशिक

कोचरगावला नऊ ठिकाणी अवैद्य दारू विक्री

पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्कचा कानाडोळा

दिंडोरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील कोचरगाव येथे अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू असून, गावात नऊ ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू आहे. याविरोधात येथील महिलांनी पोलीस ठाणे गाठत उपनिरीक्षक किसन काळे यांना निवेदन देत दारूबंदी करण्याची मागणी
केली.
गावातील अनेक तरुण दारूच्या आहारी जाऊन आपल्या जिवाला मुकले आहेत. दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. गावातील दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी दिंडोरी येथे पोलीस ठाणे गाठत दारूबंदीची मागणी केली. यावेळी सरपंच कल्पना टोंगारे, उपसरपंच गोरखनाथ लिलके, पोलीसपाटील सीता टोंगारे, अलकाबाई खाडे, मंजुळा निंबेकर आदींसह महिला उपस्थित होत्या.
दिंडोरीच्या पश्चिम भागात दारू विक्रीची दुकानेच नाही. तरीही अवैध दारू विक्री करणार्‍यांकडे दारूचे बॉक्स येतातच कसे, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकानदार बॉक्स विक्रीची परवानगी दिली तर नाही ना? असा प्रश्न यावेळी महिलांनी उपस्थित केला. दारूबंदी करण्याचे गावाने ठरविले आहे. दारू विक्री करणार्‍या महिलांनी नऊ दारू विक्रेत्याची नावे दिली आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलीस उपनिरीक्षक किसन काळे यांनी सांगितले.

अन्यथा उपोषणास बसणार

आजपर्यंत दिंडोरी पोलिसांना दोनदा निवेदने दिली. नाशिक ग्रामीण पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना निवेदन दिले, मात्र गावात राजरोसपणे अवैध दारूविक्री सुरू आहे. आज दिलेल्या निवेदनावर कारवाई झाली नाही तर नागरिक उपोषणाला बसतील.
– कल्पना टोंगारे, सरपंच, कोचरगाव

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago