नाशिक

क्रिप्टो करन्सीबाबत शासनाने धोरण ठरवावे साळगावकर

 

: डॉ. वसंत पवार यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान

नाशिक : प्रतिनिधी

क्रिप्टो करन्सी सामान्यांसाठी निर्माण झाली असली तरी त्याचे रुपांतर आता एक प्रकारे सट्टयामध्ये होत आहे. त्यातून फसवणुकीचेच प्रकार अधिक घडतात. त्यामुळे सरकारने क्रिप्टो करन्सीबाबतचे ध्येय धोरणे लवकरात लवकर स्पष्ट केल्यास त्यामध्ये विश्‍वासार्हता आणि सुसूत्रता येऊ शकेल, असे मत आर्थिक विषयाचे अभ्यासक तथा  कालनिर्णयचे संचालक जयराज साळगावकर यांनी व्यक्त केले.

माजी  खासदार  कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांची जयंती गोदावरी बँकेतर्फे प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली त्यानिमित्त आयोजित व्याख्यानात साळगावकर यांचे क्रिप्टो करन्सीवर व्याख्यानाचे आयोेजन करण्यात आले होते. त्यावेळी ते  बोलत होते.  अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील होते.  प्रमुुख  पाहुणे म्हणून माजी महापौर प्रकाश मते, सहकारी बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, विश्वास ठाकूर, सहकार भारतीच्या अध्यक्षा डॉॅ. शशिताई अहिरे आदी उपस्थित होते.  मोठया व्यवहारांसाठी क्रिप्टो करन्सी  प्रसृत केल्यानंतर किरकोळ व्यवहारांसाठी आभासी चलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आभासी टोकन पद्धतीच्या माध्यमातून ग्राहक आणि विक्रेत्यांना त्यांचे किरकोळ व्यवहार करण्यासाठी या चलनाचा वापर करता येतो. मात्र, त्याला चांगली गुंतवणूक म्हणता येणार नाही. सरकराच्या सर्वभौमत्वाला आव्हान देणारी ही व्यवस्था आहे. सरकारने ते चलनात आणले तरच मान्याता देता येईल.सध्या तरी ते सामान्यांच्या हिताचे दिसून येत नाही.  त्यामुळे आभासी चलनाचा सामान्यांना कितपत फायदा होऊ शकेल, याबाबतच साशंकता असल्याचे साळगावकर म्हणाले. अनिल भालेराव यानी सूत्रसंचालन केले. अमृता पवार यांनी प्रास्ताविक केले.वसंत खैरनार यांनी परिचय करुन दिला.  म़नियार यांनी आभार मानले. यावेळी मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमाताई पवार. नानासाहेब महाले, मविप्र संंस्थेचे अध्यक्ष  सुनील ढिकले, शरद कोशिरे, रत्नाकर कदम, नानासाहेब सोनवणे, माणिकराव शिंदे,वैद्य विक्रांत जाधव, निलीमा जाधव आदीसह नागरिक मोठ्या संख्येनेे उपस्थित होते

 

 

 

Ashvini Pande

Recent Posts

छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन*

*छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन* नाशिक: प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री…

3 hours ago

संडे अँकर: कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका

कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

3 hours ago

अखेर कृषिमंत्री कोकाटे यांनी मागितली शेतकऱ्यांची माफी

नाशिक: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री…

3 hours ago

पंचवटीतील पोलिसावर निलंबनाची कारवाई

अंमली पदार्थ विकणार्‍यांशी कनेक्शन उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस…

18 hours ago

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

2 days ago

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

3 days ago