नाशिक

ओझरच्या एअरफोर्स अधिकार्याची 98 हजाराची आँनलाईन फसवणूक

 

 

 

ओझर : वार्ताहर

 

वोकार्ट हाँस्पिटलचा रिसेप्शनिष्ट बोलतो असे सांगून आज्ञात मोबाईल धारकाने एका एअरफोर्स  अधिकार्याच्या व्हाँट्सअप नंबरवर

 

टाकलेल्या लिंक मध्ये अधिकारीने फोन पे सह युपीआय फोनची माहिती भरल्यानंतर आज्ञात मोबाईल धारकाने अधिकार्याच्या बचत खात्यातून 98 हजार 500 रुपये अवैधरित्या आँनलाईन ट्रान्सफर करुन घेत तोतयेगिरी करून या अधिकार्याची फसवणूक केली आहे

 

दिनांक  26 मार्च 23 रोजी सकाळी 11.30 ते

 

दिनांक 27 मार्च  रोजीच्या सकाळी 6.47 वाजेच्या दरम्यान सुदेशपाल  सोहनलाल एअर फोर्स ज्युनियर वारंट ऑफिसर एअरफोर्स स्टेशन ओझर नाशिक.यांना मानदुखीचा

 

त्रास होत असल्याने त्यांनी गुगल वर वोकार्ट हॉस्पीटलचा नंबर मागितला असता गुगलने 6290792586   हा नंबर दिल्यावर सुदेशपाल यांनी सदर नंबरवर कॉल केला असता  अज्ञात मोबाईल धारकाने काँल घेत वोकॉर्ट हॉस्पीटल नाशिकचा रिसेप्शनिस्ट बोलतो असे सांगुन सुदेशपाल यांना ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागेल असे सांगुन अज्ञात इसमाने त्याचे व्हॉट्सअप नंबर  6290792586 यावरुन सुदेशपाल यांचे व्हॉट्सअप नंबर  7204895621 वर

 

https://hospitalappointmen६. wxsite.com/m y-site लिंक टाकली सदरची लिंक सुदेशपाल यांनी ओपन करुन त्यांनी  त्यात माहीती भरुन स्वताचा मोबाईल नंबर तसेच फोन पे नंबरचा युपीआय पीन  220810 हा टाकल्यानंतर सुदेशपाल यांच्या खात्यातून ऑनलाईन 5 रुपये पेमेंट फी घेवून अपॉईंटमेंट फिक्स झाली असे सांगुन सुदेशपाल यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर दि. 27 मार्च 23 रोजी अज्ञात इसमाने फिर्यादीचे स्टेट बैंक ऑफ इंडीया चे बचत खाते क्रमांक  30690285676  या खात्याचे फोन पे अप्लीकेशनवरुन 98 हजार पाचशे रुपये  शाजहान रेफरन्स नं. 308698131236 यावर अवैधरित्या ऑनलाईन ट्रान्सफर करुन घेवुन तोतयेगिरी करुन सुदेशपाल सोहनलाल यांची 98 हजार 500 रुपयांची फसवणुक केली असल्याची तक्रार सुदेशपाल सोहनलाल यांनी काल नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे अधिक. तपास पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन नाशिक ग्रमीण करीत आहेत

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

20 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

21 hours ago