औरंगाबादचे नाव अखेर संभाजीनगर
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आज अखेर पूर्ण झाली असून, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाला विरोध होईल, असे चित्र होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत मंजूरी देण्यात आली. उस्मानाबादचे नावही धाराशिव करण्यात आले. तर नवी मुंबई विमानतळाला दि,बा, पाटील यांचे नाव देण्यात आले.