नाशिक

देवगावच्या अंगणवाडीतील पोषण आहाराचे घेतले नमुने

मृत पक्षी आढळल्याने खळबळ; जिल्हा परिषद अधिकार्‍यांकडून पंचनामा

निफाड : तालुका प्रतिनिधी
देवगाव (ता. निफाड) येथील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रात वितरित केलेल्या घरपोच पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी आढळल्याच्या गंभीर घटनेची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. यासंदर्भात दैनिक गांवकरीत वृत्त प्रसिद्ध होताच, रविवारी (दि. 19 जुलै) जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील, महिला व बालविकास अधिकारी कोंढार आणि बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली.
येथील लाभार्थी प्रिन्स व गणेश सुखदेव माळी यांच्या कुटुंबाला 14 जुलैला पोषण आहाराचे पाकीट देण्यात आले होते. 18 जुलैला सकाळी त्यांची आई पूजा माळी यांनी आहार तयार करण्यासाठी पाकीट उघडले असता, त्यात मृत पक्षी आढळून आला. यानंतर माजी सरपंच विनोद जोशी, माजी सरपंच वैशाली अडांगळे, प्रशांत कुलकर्णी, मनोहर बोचरे, राजेंद्र मेमाणे यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत अधिकार्‍यांनी या पोषण आहाराचा रीतसर पंचनामा केला. सदर तूरडाळ-तांदूळ रिमिक्स पाकिटावर उत्पादन दि. 11 जून 2026 व बॅच क्रमांक एम.डी.के.-बी 02-06 अशी नोंद आहे. खबरदारीचा उपाय म्हणून देवगावमधील सर्व अंगणवाडी केंद्रांतील शिल्लक आहाराचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाणार असून, तपासणीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

लहान बालकांना देण्यात येणारा अंगणवाडीतील पोषण आहार आता असुरक्षित झाला असून, यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित उत्पादक कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. – प्रशांत कुलकर्णी, ग्रामस्थ, देवगाव

दोन दिवसांपूर्वी अंगणवाडीतून पोषण आहार आणला होता. शनिवारी एक पुडा फोडला असता त्यात पक्ष्याचे पंख निघाले आणि रविवारी दुसरा पुडा फोडला तर त्यात थेट मेलेला पक्षीच आढळला. हा लहान मुलांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. – पूजा सुखदेव माळी, पालक, देवगाव

Samples of the nutritional food from the Devgaon Anganwadi were collected.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago