मनमाडच्या युनियन बँकेत एफडी घोटाळा प्रकरणातील आरोपी संदीप देशमुखला चाळीसगाव येथून अटक

मनमाडच्या युनियन बँकेत एफडी घोटाळा

प्रकरणातील आरोपी संदीप देशमुखला चाळीसगाव येथून अटक

मनमाड (प्रतिनिधी) :- मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेतून फिक्स डिपॉझिट करणाऱ्या ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संदीप देशमुख याला मनमाड पोलिसांनी चाळीसगाव येथून अटक केली असुन त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असुन त्याला पोलीस कस्टडी देण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव देशमुख यांनी दिली आहे सध्या जवळपास अडीच कोटींचा घोटाळा समोर आला असुन याची व्याप्ती वाढण्याची शक्यता महाजन यानी दिली आहे.
मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेत विमा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या संदीप देशमुखने बँकेत येणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचारी शेतकरी नोकरदार यांच्यासह सर्वसामान्य जनतेने केलेल्या फिक्स डिपॉझिट मधुन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याची माहिती समोर आली होती त्यानुसार 22 मे रोजी मनमाड शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर फसवणूकिसह इतर कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र तो त्या दिवसापासून फरार होता काल रात्री गुप्त माहितीच्या आधारे मनमाड पोलिसांनी त्याला चाळीसगाव येथून अटक केली व आज मनमाड न्यायालयात हजर करण्यात आले त्याला पोलीस कस्टडी देण्यात आली असुन आतापर्यंत अडीच कोटींचा घोटाळा समोर आला आहे पोलीस तपासात हा आकडा आणखी वाढणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी दिली आहे.तसेच यासाठी आता युनियन बँकेच्या शाखेत एक स्वतंत्र काऊंटर सुरू करण्यात आले असुन या ठिकाणी ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी सर्व कागदपत्रे देऊन तक्रार करण्याची विनंती महाजन यांनी केली आहे.या प्रकारणात संदीप देशमुख हा एकटाच नसल्याचे मत बँकिंग क्षेत्रातील नागरिकांनी व्यक्त केले असुन या घोटाळ्याची सखोल चौकशी करावी व गोरगरीब जनतेला त्यांचे पैसे परत द्यावे तसेच या घोटाळ्यात असलेल्या सर्व आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी ठेवीदार ग्राहकांनी केली आहे.

आरोपी देशमुखचे अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत सबंध..?
युनियन बँक ऑफ इंडिया मनमाड येथील शाखेत फिक्स डिपॉझिट करणाऱ्या शेकडो ग्राहकांची करोडो रुपयांची फसवणूक करणारा आरोपी संदीप देशमुख हा चाळीसगाव येथील रहिवासी असुन त्याचे स्थानिक आमदार तसेच इतर अनेक बड्या नेत्यांशी घनिष्ठ सबंध असल्याचे समोर येत आहे यामुळे त्याच्यावर कितपत कारवाई होईल याबाबत अनेक ठेवीदारांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आमच्या कष्टाची कमाई आम्ही गमावली असुन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.

भ्रष्टाचारात अनेकांचे हात काळे
मुळात युनियन बँकेत विमा प्रतिनिधीला बसण्याची परवानगी आहे का..? कारण संदीप देशमुख हा बॅंकेत आतमध्ये बँकेचा कर्मचारी म्हणून बसत होता व या बँकेचे आतापर्यंत असलेले सर्व मॅनेजर हे ग्राहकांना त्याच्याकडे पाठवत होते यामुळे संदीप हा एकटा एवढे मोठे कांड करू शकत नाही हे तर सिद्ध होते मुळात बँकेचा कर्मचारी म्हणून काम करत असताना त्याला बँक मॅनेजर किंवा इतर अधिकारी वर्गाने अडवले का नाही यामुळे या भ्रष्टाचारात अनेकांचे हात काळे असल्याने सिध्द होत आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

7 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

7 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago