घोटी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेची मागील बाजूची संरक्षक भिंत अवघ्या एका वर्षात कोसळली आहे. यामुळे नाशिक जिल्हा परिषद आणि इगतपुरी पंचायत समितीच्या अंतर्गत रोजगार हमी योजनेतून (रोहयो) झालेल्या कामाच्या दर्जेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी दोषी ठेकेदार आणि जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते लकी गोवर्धने यांनी केली आहे.
पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मोठ्या व्यासाचे पाईप टाकणे आवश्यक असताना, अत्यंत कमी क्षमतेचे छोटे पाईप बसवण्यात आले होते. त्यामुळे पाण्याचा दाब वाढून ही भिंत कोसळल्याचा आरोप गोवर्धने यांनी केला आहे. तांत्रिक नियोजनाचा अभाव आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच ही घटना घडली. सुदैवाने दुर्घटना घडली तेव्हा परिसरात विद्यार्थी नसल्याने मोठी जीवितहानी टळली; मात्र यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या कामाचा निधी रोहयोअंतर्गत ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला होता. त्यामुळे कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची होती. या प्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई करत भिंत तातडीने पुन्हा बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मजुरांना हक्काचा रोजगार देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या रोहयोचा निधी थेट ग्रामपंचायतीकडे वर्ग करून ठेकेदारांमार्फत निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत. मजुरांना डावलून केवळ नफेखोरीसाठी चाललेल्या या कारभारामुळेच ही भिंत कोसळली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.“
-लकी गोवर्धने, सामाजिक कार्यकर्ते
Sanjegaon school’s protective wall collapses within just a year; questions raised over the Employment Guarantee Scheme (EGS) work; demand for action against officials responsible.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…