नाशिक : प्रतिनिधी
तिळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत. ‘तिळगुळ घ्या, गोडगोड बोला’ असे म्हणून नात्यातील बंध दृढ करत संक्रात साजरी करण्यात आली.यंदा कोरोनामुक्त सण साजरा होत असल्याने उत्साह द्विगुणित झाला आहे. शहरात संक्रातीचा उत्साह जाणवत होता. रविवार असल्याने आप्तस्वकीयांना भेटत तिळगुळ घेत सणाचा गोडवा वाढवण्यात आला. मकरसंक्रातीला नवीन धान्य मालाची पूजा करण्यात आली. सुगड देवाजवळ, तुळशीजवळ ठेवत, बाकी सुगडाचे वाण सुवासिनी एकमेकींना देण्यात आला. सुगडवर फुले, हळदी- कुंकू वाहून पुजा करण्यात आला.
संक्रांतीनिमित्त सूर्यदेवतेचे पूजन, सुगडी पुजण करण्यात आले. स्वयंपाकात खिचडी, भाकरी, गूळपोळी असा खास बेत करीत दुपारी कुटुंबासह पतंग उडविण्याचा आस्वाद घेण्यात आला.त्यासाठी आदल्या दिवशीच तिळगूळ, लाडू-वड्या तयार करून ठेवण्यात आल्या होत्या. गुळ पोळीचा नैवेद्य दाखवत गुळ पोळीचा आस्वाद घेण्यात आला.
पंतगोत्सवाची धुम
मकर संक्रात म्हणजे पंतगोत्सव …त्यामुळे बच्चेकंपनीसह मोठ्यांनीही पंतगोत्सवाचा आनंद घेतला ..गाण्याच्या तालावर पंतगाला ढील देण्यात आली.तसेच शहरात विविध ठिकाणी पंतगोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
सोशल मीडियावर शुभेच्छांची उत्सव
सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. विविध माध्यमातून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत नात्यातील स्नेह वृद्धिंगत करण्यात आले.
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…