नाशिक

संत निवृत्तिनाथ पालखीचे उद्या प्रस्थान

नाशिक : प्रतिनिधी
आषाढी एकादशीसाठी त्र्यंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या दिंडीचे मंगळवारी (दि. 10 जून) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. पालखीचा प्रवास 26 दिवसांचा राहील. पालखीसाठी पूर्णवेळ सहा सेवेकरी व तीन बैलजोड्या संस्थानने नियुक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी अवघ्या राज्यातून वारकरी संप्रदाय पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतो. देहू व आळंदी येथील दिंड्यांनंतर त्र्यंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या दिंडीचा तिसरा क्रमांक लागतो. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ समाधिस्थळाहून निघणारी ही दिंडी 26 दिवसांचा प्रवास करते. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांतून दिंडीचा प्रवास होणार आहे. वारकर्‍यांना दिंडीच्या प्रवासात मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी संस्थानचे पदाधिकारी शासनाकडे आग्रही आहेत. यासंदर्भात 28 मे रोजी मुख्यमंत्र्यांसमवेत वारकरी संप्रदायाची बैठकही झाली. संपूर्ण दिंडी प्रवासात वॉटरप्रूफ मंडप, पुरेशी शौचालये, पाण्याचे दहा टँकर दिंडीसोबत देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दरम्यान, संत श्री निवृत्तिनाथ महाराज पालखीचे नाशिक शहरात भव्य स्वागत करण्यात येईल, अशी माहिती वकील संघातर्फे देण्यात आली.

पालखीचे प्रस्थान
दि. 10 जून : दुपारी 2 : संत श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान मंदिर, त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान. 11 जून : महानिर्वाणी आखाडा, पेगलवाडी येथून महिरावणीमार्गे सातपूरला. 12 जून : सातपूर येथून नाशिक पंचायत समिती, गणेशवाडी, पंचवटी. 13 जून : पंचवटी, मुक्तिधाम, चेहेडी, पळसे. 14 जून : पळसे, मोहदरी घाट, पास्तेमार्गे लोणारवाडी. 15 जून : लोणारवाडी, सिन्नर, कुंदेवाडी, मुसळगाव, दातली (गोल रिंगण). दि. 16 जून : खंबाळे, भोकणी, निर्‍हळमार्गे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश.

पूर्णवेळ सेवेकरी-खांदेकरी नियुक्त
यंदा संस्थानने पूर्णवेळ सहा सेवेकरी-खांदेकरी नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडेच पालखी सुपूर्द करण्यात येईल. जेणेकरून भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येईल. मातोरी, विसापूर व त्र्यंबकेश्वर येथील तीन बैलजोड्या पालखी वाहण्यासाठी राहतील. संपूर्ण 26 दिवस या बैलजोड्या वापरण्यात येतील.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago