नाशिक : प्रतिनिधी
साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगी मातेच्या मंदिरातील गर्भगृह नव्या नक्षकांत झळकणार आहे. मंदिराचा व गर्भगृहाचा जीर्णोध्दार करण्यात येणार असून, त्यासाठी चार ते पाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
श्री भगवती मंदिर जीर्णोद्धार प्रक्रियेसाठी भारतीय पुरातत्व विभाग, औरंगाबाद, मुंबई व आय आय टी, (पवई) मुंबई येथील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन श्री भगवती मंदिर व मंदिर परिसराचे तांत्रिकदृष्ट्या परीक्षणे करून प्राप्त झालेल्या अहवालानुसार गर्भगृह येथील पाणी गळती थांबविण्याबरोबरच गाभारा आकार मोठा करण्यात येणार आहे. मंदिरातील जुने नक्षिकांत चांदीचे पत्रे काढून तेथील गळती थांबविण्यासाठी मंदिर परिसरातील पर्वताला (डोंगराला) ड्रिलिंग व ग्राऊंटिंग प्रक्रियेची पूर्तता करून श्री भगवती मंदिरातील पाणी गळतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. अद्याप संभाव्य आवश्यकतेनुसार मंदिरातील देखभाल – दुरुस्ती व डागडुजीचे कामकाज सुरू आहे. नक्षिकांत चांदीचे कामकाज पु.ना.गाडगीळ पुणे यांच्या मार्फत संपूर्णतः निशुल्क व सेवा प्रकारात नियोजित असून श्री भगवती मंदिरातील चांदीच्या संपूर्ण सजावटीसाठी नाविन्यपूर्ण डिझाईनद्वारे त्यामार्फत पूर्तता केली जाणार आहे.
सद्यस्थितीत श्री भगवतीच्या गर्भगृहातील जुने चांदी धातूचे नक्षिकांत पत्रे काढण्यात आले असून पाणी गळतीसह नूतन चांदी धातूच्या डिझाईनच्या दृष्टीने विविध प्रकारची देखभाल व दुरुस्ती सुरू असून, नक्षिकांत पत्र्यांची डिझाईन तसेच निर्मितीचे काम सुरू आहे.या नक्षिकांत कामासाठी मोठ्या प्रमाणात चांदीची गरज आहे.विश्वस्त संस्थेकडे यापूर्वी भाविकांनी अर्पण केलेली चांदी जुने नक्षिकांत डिझाईनचे पत्रे तसेच नव्याने भाविकांमार्फत संभाव्य प्रकारात अर्पण होणार्या चांदी धातूच्या माध्यमातून हे कामकाज करण्यात येणार आहे. भगवती मंदिराच्या जीर्णोद्धार व त्याअनुषंगिक तांत्रिक पूर्ततेसाठी किमान 4.5 ते 5 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. या उपक्रमासाठी भाविकांनी निधी व देणगी द्यावी. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने भाविकांना केले आहे.
येथे द्या देणगी
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट यांच्या अँक्सीस बँक, दिंडोरी शाखा, जिल्हा. नाशिक या बँक बचत खाते क्र. 4710 1010 0013 989 (आय एफ एस सो कोड णढखइ0000471 वर एन.ई.एफ.टी / आर.टी. जी.एस. प्रकारात तसेच 9422 1011 18 किंवा प्रत्यक्ष विश्वत संस्थेच्या कार्यालयात रोख, धनादेश, धनाकर्ष किंवा क्यू आर कोड द्वारे निधी व देणगी जमा करू शकतात. अशी माहिती ट्रस्ट मार्फत देण्यात आली आहे.
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…
नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…