महाराष्ट्र

स्वराज संघटनेची स्थापना, छत्रपती संभाजी राजेंची घोषणा

स्वराज संघटनेची स्थापना, छत्रपती संभाजी राजेंची घोषणा
पुणे : मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. अपक्ष म्हणून काही दिवसांनी होणारी राज्यसभेची निवडणूक लढविणार असून, आपण स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना करीत असल्याची घोषणा छत्रपती संभाजी राजे यांनी आज पुण्यात केली. पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. स्वराज्य हे माझ्या नव्या संघटनेचे नाव असून या संघटनेचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेने आतापर्यंत छत्रपती घराण्यावर नितांत प्रेम केले आहे. या प्रेमापोटी मी महाराष्ट्र पिंजून काढू शकलो. 2007 पासून आतापर्यंत मी गोंदिया वगळता संपूर्ण राज्याचा दौरा केला आहे. मागील 15-20 वर्षांत शेतकर्‍यांचे, कामगारांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊ शकलो. लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांवर प्रेम का करतात, हे मला अनुभवास मिळाले. त्यातून काम करण्याची उर्जा मला मिळाली. त्यातून काम करण्यासाठी मला एक नवी ऊर्जा मिळाली. हे लक्षात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून बोलावून मला राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्याची विनंती केली. राष्ट्रपती नियुक्त खासदाराची प्रतिष्ठा वेगळी असते. त्यामुळे मी 2016 मध्ये ते पद स्वीकारले. आगामी काळात या संघटनेचे रुपांतर पक्षात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago