सावानाच्या उपाध्यक्षपदी विक्रांत जाधव, सुनील कुटे विजयी
नाशिक : सावानाच्या उपाध्यक्षपदी ग्रंथालय भूषण पॅनलचे वैद्य विक्रांत जाधव आणि प्रा. सुनील कुटे हे विजयी झाले. मानसी देशमुख आणि प्राचार्य दिलीप धोंडगे यांना पराभवाचा सामना करावा लागला.अध्यक्षपदी ग्रंथालय भूषणचेच प्रा. दिलीप फडके हे निवडून आले आहेत. विजयानंतर जल्लोष करण्यात आला. सुनील कुटे यांना 1987 तर वैद्य विक्रांत जाधव यांना 2027 मते मिळाली. विरोधी ग्रंथमित्र पॅनलच्या मानसी देशमुख यांना 1690 आणि दिलीप धोंडगे यांना 1826 मते मिळाली. एकूण 140 मते बाद झाली.