अध्यक्षपदासाठी 4 तर उपाध्यक्ष पदासाठी 5 अर्ज दाखल
नाशिक : प्रतिनिधी
सावानाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी 3 उपाध्यपदासाठी 2 तर कार्यकारिणी सदस्य पदासाठी 22 अर्ज दाखल झाले. तर अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी पर्यंत अध्यक्षपदासाठी एकूण 4, उपाध्यक्ष पदासाठी 5 तर कार्यकारिणी सदस्य पदासाठी 81 असे एकूण 90 अर्ज दाखल झाले आहेत. तर छाननी नंतर या ९० उमेदवारांमधून अंतिम उमेदवार ठरणार आहेत. अर्ज विक्रीचा काल शेवटचा दिवस होता. तीन दिवसात १२८ अर्जाची विक्री झाली त्यापैकी ९० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी अर्ज छाननी होऊन वैध उमेदवारांची यादी शनिवारी प्रसिद्ध होणार आहे.
अध्यक्षपदासाठी वसंतराव खैरनार, दिलीप फडके, मकरंद सुखात्मे आणि विलास पोतदार यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर तर उपाध्यक्ष पदासाठी सुनील कुटे, मानसी देशमुख, दिलीप धोंडगे, वैद्य विक्रांत जाधव, बाळासाहेब गुंजाळ यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच मिलिंद गांधी यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज नेला होता. मात्र, दाखल केला नाही. तर समीर शेटे, हंसराज वडघुले, डॉ. धर्माजी बोडके, रवींद्र कदम, प्रशांत पाटील यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज नेले होते मात्र, त्यांनी अर्ज दाखल केले नाही.