नाशिक

सावाना अध्यक्षपदी दिलीप फडके विजयी

नाशिक : प्रतिनिधी

सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक सुरूवातीपासूनच चुरशीची ठरली.मतमोजणीच्यावेळी तोच प्रत्यय आला. आज सकाळी साडे दहा वाजता मत मोजणीला सुरूवात झाली. शेवटच्या फेरीअखेर वसंत खैरनार यांना 1904 तर दिलीप फडके यांना 1977 मते मिळाल्याने ग्रंथालय भूषण पॅनलच्या दिलीप फडके यांचा 73 मतांनी विजय झाला. पहिल्या फेरीअखेर आघाडी घेतलेल्या ग्रंथमित्रच्या वसंत खैरनार हे दुसऱ्या फेरीत पिछाडीवर गेले. यामुळे ग्रंथालय भूषणचे दिलीप फडके यांचा विजय झाला आहे. एकूण 6 हजार 189 आजीव सभासदांपैकी 3 हजार 904 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणुकीसाठी  एकूण 63.18 टक्के एवढे मतदान झाले होते. तर उद्या  कार्यकारिणी मंडळाची मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे.  सावाना निवडणुकीसाठी  ग्रंथमित्र  आणि ग्रंथालय भूषण असे दाेन पॅनल आहेत. तर यासह 12 वैयक्तीक उमेदवार असे एकूण 48 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. चुरशीच्या लढतीत गंथालय भूषण पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध  केले असले तरी उद्याच्या निकालानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

Ashvini Pande

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

2 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

2 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

12 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

23 hours ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

1 day ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago