नाशिक : प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक सुरूवातीपासूनच चुरशीची ठरली.मतमोजणीच्यावेळी तोच प्रत्यय आला. आज सकाळी साडे दहा वाजता मत मोजणीला सुरूवात झाली. शेवटच्या फेरीअखेर वसंत खैरनार यांना 1904 तर दिलीप फडके यांना 1977 मते मिळाल्याने ग्रंथालय भूषण पॅनलच्या दिलीप फडके यांचा 73 मतांनी विजय झाला. पहिल्या फेरीअखेर आघाडी घेतलेल्या ग्रंथमित्रच्या वसंत खैरनार हे दुसऱ्या फेरीत पिछाडीवर गेले. यामुळे ग्रंथालय भूषणचे दिलीप फडके यांचा विजय झाला आहे. एकूण 6 हजार 189 आजीव सभासदांपैकी 3 हजार 904 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणुकीसाठी एकूण 63.18 टक्के एवढे मतदान झाले होते. तर उद्या कार्यकारिणी मंडळाची मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे. सावाना निवडणुकीसाठी ग्रंथमित्र आणि ग्रंथालय भूषण असे दाेन पॅनल आहेत. तर यासह 12 वैयक्तीक उमेदवार असे एकूण 48 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. चुरशीच्या लढतीत गंथालय भूषण पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध केले असले तरी उद्याच्या निकालानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.