सावाना मुक्तद्वार विभाग शनिवारपासून पूर्ववत

नाशिक : सार्वजनिक वाचनालय, नाशिक (सावाना)चा मुक्तद्वार विभाग नव्या जागेत म्हणजे वाचनालयाचा जुना देवघेव विभाग येथे शनिवार, दि. 28 मे 2022 पासून पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कार्याध्यक्ष गिरीश नातू, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके, सह. सचिव ऍड. अभिजित बगदे व ग्रंथसचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली. सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 4 ते रात्री 8 पर्यंत खुले असेल. कोरोनामुळे हा विभाग दीर्घकाळ बंद ठेवावा लागला होता. मुक्तद्वार विभाग पूर्ववत सुरू होत असल्याने नाशिक आणि जिल्ह्यातील चोखंदळ वाचकांसाठी ही एकप्रकारे पुन्हा पर्वणीच ठरणार आहे, असे जातेगावकर यांनी नमूद केले. गंगापूररोडवरील उद्यान वाचनालायतील मुक्तद्वार विभाग याआधीच सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
कुशल चोपडा व मिताली पूरकर यांची निवड
नाशिक : इंदूर येथे होणार्‍या 83 व्या कॅडेट व सबज्युनिअर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा 2022 साठी कुशल चोपडा व मिताली पूरकर यांची 15 वर्षांखालील अनुक्रमे मुले व मुलींच्या महाराष्ट्र टेबल टेनिस संघात निवड झाली. या स्पर्धा 25 मे ते 2 जूनपर्यंत इंदूर येथे होणार आहेत. कुशल हा महाराष्ट्रात प्रथम तर राष्ट्रीय स्तरावर तिसरा मानांकित खेळाडू आहे. हे दोघेही जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. या निवडीबद्दल नरेंद्र छाजेड, शेखर भंडारी, मिलिंद कचोळे, राजेश भरवीरकर, संजय वसंत, अभिषेक छाजेड, सतीश पटेल यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *