नाशिक-181 वर्षांची परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालय,नाशिकचे(सावाना) वस्तुसंग्रहालय विविध वस्तूंचे जणू ज्ञानभांडारच असून आमजनतेला त्याची माहिती व्हावी यासाठी ते खुले करावे अशी मागणी मोठ्याप्रमाणात जोर धरू लागल्याने बुधवार दि.25 मेपासून चार दिवसांसाठी ते खुले करण्यात येणार असल्याची माहिती सावानाच्या वास्तुसंग्रहालय समितीच्या नवनिर्वाचित सचिव सौ.प्रेरणा बेळे यांनी दिली.
सावानाच्या वैभवात भर टाकणारा हा विभाग आहे.जुन्या दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय हे त्याचे आगळे वैशिष्ट्य आहे.1857ला इस्टइंडिया कंपनीने तयार केलाला विशाल हिंदुस्थानचा जुना नकाशा येथे आहे.प्रत्येक खेड्याचा त्यात उल्लेख आहे हे विशेष.श्रीलंका, ब्रम्हदेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान ही सारी राष्ट्रेही या नकाशात आहेत.
प्रा.वसंत कानेटकर ज्या डेस्कवर लिखाण करीत होते तो डेस्क, पाषाण शिल्प,काष्टशिल्प, सायक्लोस्टायलिंग मशीन तसेच जुन्या ऐतिहासिक शस्त्रगार, काचचित्रे, गंजिफा, धातूदेव मूर्ती, धातूच्या अन्य मूर्ती, नाणी, चित्रे, हसऱ्या चेहऱ्याची भगवान शंकराची मूर्ती आदी अनोखा ठेवा आपणास येथें बघावयास मिळेल.या विभागात दुर्मिळ अशी दख्खन मराठा शैलीतील रागमालेतील चित्रे यांचा मोठा संग्रह आहे.या संग्रहालयात विविध वस्तु म्हणजे शिल्पकला, चित्रकला तसेच प्राचीन तत्कालीन इतिहासाचे नमुने आहेत.मूर्तिकला आहे शिल्पकलाही येथे आहे या साऱ्या कलांचे अनोखे दर्शनही आपल्याला या वस्तुसंग्रहालयात घडणार आहे.पर्यटक, जिज्ञासूं तसेच नाशिककरांसाठी ही एकप्रकारे पर्वणीच ठरणार आहे. बुधवार दि. 25मे ते शनिवार.दि.28 मेपर्यंत सकाळी 11ते रात्री 8 पर्यंत हे वास्तुसंग्रहालय विनामूल्य बघता येईल.या सुवर्णसंधीचा सर्वांनी घ्यावा व तेथे असलेल्या वहीत आपला अभिप्रायही नोंदवावा असे आवाहन सौ.प्रेरणा बेळे तसेच वाचनालायचे अध्यक्ष प्रा दिलीप फडके, धर्माजी बोडके, व सर्व पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळ सदस्यांनी केले.नुकताच वास्तुसंग्रहालय दिन साजरा झाला त्यानिमित्ताने विशेष बाब म्हणून ही सवलत देण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…
नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…
बराजकमल एंटरटेनमेंट'ची दमदार घोषणा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट…