नाशिक : प्रतिनिधी शहरात मागील पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे . हवामान खात्याने शहर व जिल्ह्यात रेड अलर्ट दिला असून , प्रशासन सतर्क झाले आहे . या पार्श्वभूमीवर २० जुलै रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे . आता ही परीक्षा ३१ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी दिली . पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( ५ वी ) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( ८ वी ) पाच दिवसांनी होणार होती . मात्र , सध्याची परिस्थिती पाहता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे . जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश स्थिती व बहुतांश ठिकाणी भूस्खलनामूळे वाहतूक बंद झाली आहे . या सर्व परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे . त्यामुळे सुरक्षेचा विचार करून या परीक्षा ( दि . ३१ ) घेण्यात येणार आहे . यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दिनांक ३१ जुलै रोजी ग्राह्य धरण्यात येईल , असे त्यांनी सांगितले .
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…
नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…