सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील गोंदे शिवारात शेततळ्यात बुडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कृष्णा अर्जुन तांबे (15) असे मुलाचे नाव आहे. आपल्या मित्रांसोबत दुपारच्या सुमारास गावातील सोमनाथ येबाजी सोनवणे यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. मित्रांनी आरडाओरडा करुन गावातील लोकांना जमा केले. ग्रामस्थांच्या मदतीने अर्जुनला पाण्यातून बाहेर काढून सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी संजय निवृत्ती तांबे यांनी नांदुरशिंगोटे दुरक्षेत्रात येत याप्रकरणी माहिती दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक आर. टी. तांदळकर करत आहेत.
नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…