पक्षातून बाहेर काढण्यासाठी तांबे-थोराताविरोधात स्क्रीप्ट तयार

पक्षातून बाहेर काढण्यासाठी तांबे-थोराताविरोधात स्क्रीप्ट तयार

 

आमदार तांबेचा प्रदेशाध्यक्ष पटोलेंवर नाव न घेता आरोप

 

नाशिक : प्रतिनिधी

 

नाशिक पदवीधर निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने एबी फॉर्म पाठवण्यात आले. त्यामुळे शेवटच्या क्षणी नाइलाज नसल्याने अपक्ष म्हणून उमेद्वारी अर्ज भरावा लागला. विशेषत: त्या अर्जावर इडियन नॅशनल क़ोग्रस नावानेच अर्ज भरला होता. परंतु एबी फॉर्म नसल्याने तो अपक्ष ठववण्यात आला. यानंतर ज्या पद्धतीने तांबे कुटुंबावर आरोप झाले, ते पाहता तांबे व थोरातांना अडचणीत आणन्यासाठी पक्षांतर्गत स्क्रीप्ट तयार होती असा आरोप

आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत घेत कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

आमदार झाल्यावर तीसऱ्याच दिवशी तांबे यांनी शनिवारी (दि.4) पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेले आरोपावर त्यांचे म्हणने मांडत पक्षांतर्गतच कुरघोडी सुरु असल्याचा गंभीर आरोप यावेळी केला. जेव्हा मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पहिल्याच वेळी माध्यमांशी बोलतांना स्पष्ट सांगितलं होत की मी काँग्रेसचा उमेदवार आहे, हे माझं पहिलं वाक्य होत. माझ्या वडिलांनी माझ्या उमेद्वारीवरुन महाविकास आघाडी शब्द वापरत, की आम्ही महाविकास आघाडीचे आहोत, मात्र तांबे कुटुंबियांना काँग्रेसमधून ढकलण्यासाठी हे सर्व षडयंत्र रचलं गेल. विशेषत: निवडणुकीदरम्यान ज्या पद्धतीने काँग्रेसकडून एबी फॉर्म पाठवण्यात आले ते एबी फॉर्मच चुकीचे असल्याचे आमदार त्यांने यांनी म्हटले. अपक्ष उमेद्वारी अर्ज भरल्यानंतर तांबे कुटुंबियांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठी युवक उमेदवाराला संधी न देण्यासाठी व थोरातांना अडचणीत आणण्यासाठी एक स्क्रीप्टच तयार केल्याचा आरोप  केला. माझे वडील सांगता होते की मला उभं राहायचं नाही, माझ्या मुलाला संधी द्या, मात्र नंतर वडिलांची उमेदवारी साडेबारा वाजता का जाहीर करण्यात आली. तसेच नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीतील कॉगेस उमेद्वारांची उमेद्वारी ही दिल्ली वरुन जाहीर झाली नाही. मग नाशिकसाठीच उमेद्वारी दिल्लीतून जाहीर करण्यात आली. कारण पक्षातील काही जनांकडून जाणुनबूजून युवा चेहऱ्याला संधी मिळू नये, हा पूर्णपणे एका षडयंत्राचा भाग होता. ही स्क्रीप्ट तयार करण्यात आली होती, आणि बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी, सत्यजित तांबेला उमेदवारी मिळू नये यासाठी, आमच्या परिवाराला कुठेतरी पक्षाच्या बाहेर ढकलण्यासाठी होती. असा थेट आरोपच आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत केला.

 

 

निवडणुकीत कॉग्रेस, राष्ट्रवादीकडून मदत

पदवीधर निवडणुकीत आपल्याला भाजपसह सेना, राष्ट्रवादी यांची मदत मिळाली. विशेष म्हणजे विभागातील सर्व कॉग्रेसचे नेते आपल्यासोबत असल्याचा दावा आमदार सत्यजीत तांबे यांनी केला. कोणी मदत केली, त्यांची नावे सांगून त्यांना अडचणीत आणनार नसल्याचे म्हटले.

…..

जाहीर माफी मागायलया सांगितलेी

जेव्हा अपक्ष म्हणून उमेद्वारी अर्ज भरला त्यावेळी देखील पक्षातील वरिष्ठांशी बोलणे सुरु होते. यावेळी जाहीर माफी मागावी असे सांगण्यात आले. जर आपण काहीच चूक केली नाही तर माफी का, मात्र स्वत:चीच समजूत काढून मी जाहीर माफी मागायला तयार झालो. परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेद्वार घोषीत केल्याचेही समोर आले. त्यामुळे पक्षांतर्गतच तांबे आणि थोरांतांना अडचणीत आणन्यासाठी घडामोडी सुरु असल्याचे चित्र होते

अपक्ष राहणार कुठेही जाणार नाही

 

मी कॉगेस सोडलेली नाही, मात्र उमेद्वारी अर्ज अपक्ष म्हणून केली. त्यासाठी विविध शंभर संघटनांनी पाठिंबा दिला. याशिवाय भाजप, सेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी या पक्षातील प्रत्येकाने आपल्याला मदत केली. त्यामुळे आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही. तसेच यापुढे आता केवळ विभागातील युवक, पदवीधर, शिक्षक यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी काम करायचे आहे. जुन्या पेन्शनसाठी शासनावर दबाव आणू असे तांबे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *