नाशिक : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेची मुलगी ही दि. २ जून ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत वेळोवेळी घरी एकटी असल्याची संधी साधून संशयित शोएब नवाज खान (पठाण) (वय ३३, रा. नाईकवाडीपुरा, जुने नाशिक) हा घरी येत होता . पीडित मुलगी ही झोपेत असताना तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करीत असल्याची बाब लक्षात आल्यावर पीडित मुलीच्या आईने भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित शोएब खान याच्याविरुद्ध फिर्याद दिली. बाललैगिंक अत्याचर पोक्सो
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिडकर करीत आहेत.