नाशिक

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध

सिन्नर : वार्ताहर
ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या गोंदेश्वर मंदिर येथील दानकर्ता गोविंदराज यांचे शिल्प प्रथमच प्रकाशझोतात आले आहे. इतिहास अभ्यासक प्रा. जावेद शेख यांनी मंदिराच्या स्थापत्यशैलीवर संशोधन करताना या शिल्पाची ओळख पटवली आहे. या शोधामुळे गोंदेश्वर मंदिराच्या इतिहास अभ्यासाला नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
गोंदेश्वर मंदिराच्या बांधणीसंदर्भात शिलालेख किंवा ताम्रपट स्वरूपात स्पष्ट पुरावा उपलब्ध नाही. मात्र,. श्रीचक्रधर स्वामी यांच्या ‘लीळाचरित्र’ ग्रंथात ‘गोविंद’ नावाच्या व्यक्तीने मंदिर उभारल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे गोविंदराज या दानशूर व्यक्तीने मंदिर बांधले असावे, अशी ऐतिहासिक शक्यता अभ्यासक व्यक्त करतात.
गोविंदराज नेमके कोण होते, याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते ते धनाढ्य व्यापारी होते, तर काहींच्या मते यादव राजा मल्लगी (पहिला) यांचे पुत्र युवराज गोविंदराज यांनी हे मंदिर उभारले असावे. लेखी पुराव्याअभावी निश्चित निष्कर्ष निघाला नसला तरी मंदिरातील शिल्प ही एक महत्त्वाची साक्ष मानली जात आहे. मंदिराच्या पूर्वद्वारातून मुख्य सभामंडपात प्रवेश केल्यानंतर उत्तर-पूर्व स्तंभावरील पायथ्याच्या कोष्टकात अंजली मुद्रेत उभी असलेली मानवी आकृती दिसते. दाढी, साधे वस्त्र, मोजके अलंकार, कानातील कुंडले आणि उजव्या कानामागे अंबाडा ही या शिल्पाची वैशिष्ट्ये आहेत. शिल्पशास्त्रातील ‘मानसार’ आणि ‘शिल्पप्रकाश’ यांसारख्या ग्रंथांनुसार दानकर्त्याचे शिल्प अंजली मुद्रेत, स्तंभावर किंवा प्रवेशद्वाराजवळ आणि देवतेपेक्षा लहान आकारमानात असावे, असे नमूद आहे. सदर शिल्प या निकषांशी सुसंगत असल्याचे प्रा. शेख यांनी स्पष्ट केले. शतकानुशतके दुर्लक्षित राहिलेले हे शिल्प समोर आल्याने सिन्नरच्या ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारशाला नवी झळाळी मिळाली आहे. गोंदेश्वरासारखे भव्य शैव पंचायतन मंदिर उभारणार्‍या गोविंदराज यांच्या योगदानाची जाणीव यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.

’गोंदेश्वर मंदिर दर्शन’चे प्रकाशन

दरम्यान, प्रा. जावेद शेख यांचे शिवचरित्र प्रकाशित झाले आहे. त्रिंगलवाडी किल्ला आणि गोंदेश्वर मंदिरावर त्यांचे संशोधन सुरू आहे. ‘गोंदेश्वर मंदिर दर्शन’ हे त्यांचे पुस्तक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रकाशित होणार आहे. त्यामध्ये मंदिराशी संबंधित धार्मिक, ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्या महत्त्वपूर्ण माहितीचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला आहे.

Sculpture of the donor of Gondeshwar temple in the spotlight

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

3 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

4 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

4 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

4 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

4 hours ago

स्व. डॉ. वसंतराव नगरकर : बहुआयामी व्यक्तिमत्त्व

नाशिकरोडच्या सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, राजकीय, शैक्षणिक, तसेच ट्रान्स्पोर्ट क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे, आपल्या मनमिळाऊ…

4 hours ago