शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम
निफाड : विशेष प्रतिनिधी
निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी नाशिक जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांच्या माध्यमातून 1 ते 15 जुलैदरम्यान विशेष
सर्वेक्षण मोहीम राबवली जात आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व बालकांना शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक शिक्षकाला आपापल्या क्षेत्रात जाऊन शाळाबाह्य, स्थलांतरित, काम करणारी मुले, अनाथ व विशेष मुलांची यादी तयार करायची आहे. ही माहिती ‘सर्वेक्षण फॉर्म‘द्वारे संकलित करून शासकीय पोर्टलवर अपलोड करायची आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यासाठी तयारी पूर्ण केली आहे. शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकार्यांना याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे एकही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, हा आहे.
सर्व शिक्षकांना सर्वेक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये मुलांचे नाव, वय, पालकांची माहिती, सध्याचा शिक्षणाचा दर्जा, विशेष गरजा असलेल्या मुलांचे तपशील व स्थलांतराचा इतिहास यांचा समावेश असेल. शाळा पूर्व वयातील 3 ते 6 वर्षे वयो गटातील मुले तसेच 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व बालक या सर्वेक्षणात समाविष्ट असतील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, तसेच प्राथमिकचे शिक्षणाधिकारी आणि इतर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकार्यांनी या मोहिमेचे बारकाईने नियोजन केले आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या ‘दखल‘ प्रणालीवर ही माहिती अपलोड करण्यात येईल.
या माहितीच्या आधारे पुढील शैक्षणिक धोरणे ठरवण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…
गड-किल्ले, डोंगरदर्या चढून तिथल्या निसर्गसौंदर्याने भारावून जाणे आणि इतिहासाची माहिती घेणे असा दुहेरी आनंद मिळतो…