अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

मुंबई: प्रख्यात मराठी अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी निधन झाले.  त्या 81 वर्षाच्याया होत्या, लावती रुग्णालयात त्यांनी  अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी रमेश देव यांच्या सोबत अनेक भूमिका साकारल्या. जगाच्या पाठीवर, जानकी, आनंद याबरोबरच अनेक मराठी हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांना अल्झायमर चा त्रास होता. त्यांचे पती रमेश देव यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. शालीन आणि देखनी अभिनेत्री असलेल्या सीमा देव यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले होते.

मंत्री भुजबळ यांनी वाहिली श्रद्धांजली

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! सरस्वतीचंद्र, आनंद, ड्रीम गर्ल, जगाच्या पाठीवर, सुवासिनी अशा हिंदी-मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एक सोज्ज्वळ चेहरा हरपला आहे. देव कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे, त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

छगन भुजबळ
मंत्री,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य

 

 

Bhagwat Udavant

Recent Posts

ठाकरे गटाच्या या बड्या नेत्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…

6 hours ago

मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल

  मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…

11 hours ago

ट्रॅपची माहिती होती, तर सतर्क का केले नाही?

मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…

11 hours ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…

11 hours ago

महापालिका जिंकायचीय, वाद टाळून कामाला लागा

मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…

11 hours ago

कांदा उत्पादकांवर ओढावणार आर्थिक संकट?

दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…

12 hours ago