राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा
गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत
सातपूर : सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमधील राधाकृष्णनगर मध्ये ऐन दीपावलीच्या दिवशी परप्रांतीय स्वयंघोषित भाईने व त्याच्या बहीणेने फटाके वाजवण्याच्या क्षुल्लक करणावरून गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत शिवीगाळ करत दहशत माजवून सातपूर पोलिसांना आव्हान दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वयंघोषित भाई आकाश पांडे व त्याची बहीण हे दुसऱ्याच्या दारात मोठ्या आवाजाचे फटाके फोडत होते. तृप्ती संदीप पोखरकर रा. राधाकृष्णनगर यांच्या घरात लहान बालक असल्याने मोठ्या आवाजाचे फटाके फोडू नका असे आकाश पांडे व त्याच्या बहिणीला सांगितले. यांचा राग येऊन आकाश पांडे याने शिवीगाळ करत संपूर्ण गल्लीला पेटवून देऊ, कापून टाकू अशी धमकी देत दहशत निर्माण केली. याबाबत पोखरकर यांनी सातपूर पोलीस स्टेश मध्ये तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिसांनी संशयित भाईवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना व नागरिकांना आव्हान देणाऱ्या संशयित भाईवर सातपूर पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…
जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…
सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…
जमीन खंडणी प्रकरणी सातपुर पोलिसात गुन्हा सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर परिसरात खंडणी व…
सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर गोळीबार आणि अंबड येथील बंगला खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी निखिलकुमार…