लाडक्या बहिणींबाबत शासनाने घेतला आता हा निर्णय

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा
मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली होती. त्यामुळे लाडक्या बहि‍णी काहीशा नाराज झाल्या होत्या. त्यातच केवायसी करताना अनेक अडचणी येत होत्या. शिवाय निवडणूक संपल्यानंतर सरकारने अनेक महिलांना या योजनेतून वगळले होते. त्यामुळे मोठी नाराजी निर्माण झाली होती. विरोधक सुध्दा टीका करत होते. परंतु
आता सरकारने ई-केवायसीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.महायुती सरकारने भाऊबीजेच्या तोंडावर लाडक्या बहि‍णींची नाराजी दूर करण्यासाठी योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. सध्या ई-केवायसीद्वारे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांचा शोध सुरु होता. यात महिलेच्या वडिलांसह पतीच्या कमाईचीही खातरजमा केली जात आहे. सुमारे ७० लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. परंतु आता महायुती सरकारने ई-केवायसीला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांनी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तसेच नगरपालिका निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत लाडक्या बहिणीच्या नाराजीचा फटका बसू नये, म्हणून हा निर्णय तात्पुरता रद्द केला असल्याचे बोललं जातं आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago