format: 0; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 12582912;cct_value: 0;AI_Scene: (13, 0);aec_lux: 184.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 41;
राऊत, नांदगावकर यांच्याकडून कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश
नाशिक : प्रतिनिधी
जनतेच्या मूलभूत समस्यांविरोधात जाब विचारण्यासाठीच मोर्चा काढण्यात आला. जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा नेपाळ होते. नाशिकचे नेपाळचे होऊ द्यायचे नसेल तर सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे. राहुल धोत्रे या तरुणाची हत्या देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी केली. वीस दिवस होऊनही उद्धव निमसे याला अटक कशी होत नाही? आरोपी सापडत नसेल तर हे सरकार नालायक आहे, असा जोरदार घणाघात खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्यावर शुक्रवारी (दि. 12) केला.
मनसे व शिवसेना ठाकरे गटातर्फे शहरातील समस्यांविरोधात बी. डी. भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चानंतर झालेल्या भाषणात खा. राऊत बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, खासदार राजाभाऊ वाजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, माजी
आमदार वसंत गिते, मनसे जिल्हाप्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, महिला प्रदेशाध्यक्ष सुजाता डेरे यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राऊत पुढे म्हणाले, की यानंतर नाशिकमधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार. दोन भाऊ एकत्रित आले आहेत. कार्यकर्ते एकत्रित आले आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. हा महाराष्ट्र यापुढे ठाकरेंच्या मागे जाईल, हा नाशिकने संदेश दिला आहे. ही एकजूट आगामी होऊ घातलेल्या नाशिक महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांना दाखवून द्यावी लागेल. मनपा निवडणुकीला मनसे आणि शिवसेना यांनी संयुक्तपणे सामोरे गेले पाहिजे. तसे चित्र नाशिकपासून तयार झाले आहे, असे ते म्हणाले.
मोर्चात या मुद्यांवर फोकस…
♦ शहरातील वाढती गुन्हेगारी
♦ कायदा व सुव्यवस्था
♦ एमडी ड्रग्ज विळखा
♦ दत्तक नाशिकच्या समस्या
♦ शहरातील खड्डे
♦ पिकांना हमीभाव
♦ आदिवासी आंदोलन
♦ मनपातील भ्रष्टाचार
ठाकरे ब्रॅण्ड संपला म्हणणार्यांना इशारा
रक्ताचं आणि भक्ताचं नातं कधीच संपत नाही. नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारलं जात नाही. ये तो सिर्फ झांकी है । बहुत कुछ अभी है। या मोर्चाला झालेली गर्दी ही ठाकरे ब्रॅण्ड संपला म्हणणार्यांना इशारा आहे. ज्यांच्या जीवावर तुम्ही मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झालात, तुमच्या कितीही पिढ्या आल्या तरी ठाकरे ब्रॅण्ड संपू शकत नाहीत. आता नेतेमंडळी आणि कार्यकर्ते एकत्र आले आहेत. दोन्ही बंधू एकत्र उतरले की, तुमचं काय होईल हा विचार करा. फोडाफोडी करून पक्ष वाढवतात. सर्वजण मराठी म्हणून एकत्र येेऊया. विराट मोर्चाची सरकारला नोंद घ्यावीच लागेल. नाशिकपासून एकजुटीची सुरुवात झाली आहे. राज्यात ही एकजूट दिसेल.
– बाळा नांदगावकर, मनसे नेते
एकजुटीची मशाल धगधगती ठेवा
दत्तक नाशिक पोरके झाले आहे. जिल्ह्यात चार मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यात पालकमंत्रिपदावरून स्पर्धा लागलेली आहे. जनता विविध समस्यांनी त्रस्त आहे. जनतेला गृहीत धरले आहे. दुसर्यांचे नगरसेवक ओरबाडायचे, कशाही पद्धतीने सत्तेत यायचे आणि सत्ता उपभोगायची, एवढंच यांचं काम आहे. जनआक्रोश मोर्चाची डरकाळी नाशिकच्या जनतेची आहे. बाळासाहेबांच्या दोन छाव्यांची आहे. एकजूट तुटू देऊ नका. नाशिकमध्ये आपली ताकद दाखवायची आहे. एकजुटीची मशाल धगधगती ठेवा.
– अविनाश अभ्यंकर, मनसे नेते
डॅडींनी नाशिकचे वाटोळे केले
नाशिक शहर वाइनसाठी प्रसिद्ध होते. आता ते हनीसाठी प्रसिद्ध झाले असून, आता हनीचे ट्रॅप लागायला लागले आहेत. मनसेची सत्ता असताना शहरातील रस्त्यांवरील खड्डे शोधावे लागत होते. पण आता संपूर्ण शहर खड्डयात गेले आहे. नाशिकला दत्तक घेतलेल्या डॅडींनी सांभाळ करणे तर सोडा, मनसेने उभारलेल्या प्रकल्पाचेही भाजपाने वाटोळे केले. कुसुमाग्रजांची नगरी गुन्हेगारी, हनी ट्रॅप, ड्रग्जमाफिया यामुळे कुप्रसिद्ध झाली आहे. शहरात अशा प्रकारची अराजकता राहिली तर नाशिकचे नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही. नाशिकचे नेपाळ होऊ नये यासाठी मनसे, शिवसेना एकत्र येत मोर्चा काढला आहे. गिरीश महाजन नाशिकवर आलेल्या संकटाचे मोचन कधी करणार? शहरात ड्रग्ज वितरित करताना कोणी आढळले तर त्याला मनसैनिक व शिवसैनिकांनी चोपावे.
– संदीप देशपांडे, मनसे नेते
ठाकरे ब्रॅण्डच्या एकत्रीकरणाची सुरुवात
ठाकरे ब्रॅण्डच्या एकत्रीकरणाची सुरुवात नाशिकमधून झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. यापुढे जनतेच्या प्रश्नांसाठी दोन्ही पक्ष तत्पर असतील.
– खा. राजाभाऊ वाजे, शिवसेना ठाकरे गट
शहर भयमुक्त करणार
देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या नाशिकची अवस्था अत्यंत वाईट आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फक्त मनसे आणि शिवसेना फोडू शकते. त्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आमच्या सेना शहर भयमुक्त केल्याशिवाय राहणार नाही.
– दत्ता गायकवाड, उपनेते, शिवसेना ठाकरे गट
मोर्चात प्रात्यक्षिक
या मोर्चात शहरातील विविध समस्यांचे प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले होते. या एमडी ड्रग्ज, गुन्हेगारी, कायदा व सुवस्था या मुद्यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…